शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर; दर ५ वर्षांनी ६५ टक्के वाढ नियम गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 21:14 IST

खासदार बळवंत वानखडे यांचे शिष्यवृत्ती वाढीसाठी केंद्रीय मंत्र्याच्या सचिवांस पत्र, गत १२ वर्षांत शून्य टक्के वाढ

अमरावती : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा विसर सरकारला पडला आहे. नियमानुसार दर ५ वर्षांनी ६५ टक्के शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करणे अपेक्षित हाेते. मात्र, गेल्या १२ वर्षांत एकदाही शिष्यवृत्तीत वाढ झालेली नाही. या गंभीर विषयी खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या सचिवांस पत्र पाठविले आहे.मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी गत काही दिवसांपूर्वी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याच्या विषयांबाबत खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार खासदार वानखडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना ७ जुलै रोजी पत्र पाठविले आहे. मात्र, अद्यापही केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीविषयी सकारात्मकदृष्ट्या निर्णय झाला नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.यांना मिळते शिष्यवृत्तीभारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी), विशेष मागास गट (एनटी, डीएनटी) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. त्यामध्ये वर्ग ११ वी ते विविध शाखांतील पदवी, पदविका, पदव्युतर पदवी अशा ४ ग्रुपद्वारे दर आकारले आहेत. यातील ग्रुप ३ च्या विद्यार्थ्यांना २००४ पर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १८५० रुपये होती. त्यानंतर २०१० मध्ये सरकारने ती वाढवून ३ हजार रुपये केली. त्यानंतर गेल्या १५ वर्षांत शिष्यवृत्तीच्या रकमेत एक पैसाही वाढ करण्यात आलेली नाही.शिष्यवृत्तीत दोनशे टक्के वाढ करणे काळाची गरजशिष्यवृत्ती दरामध्ये दर ५ वर्षांनी ६० ते ६५ टक्के वाढ करण्याचा नियम आहे. केंद्र सरकारने १२ वर्षांत १ रुपयाचीसुद्धा वाढ केली नाही. मात्र, १२ वर्षांनंतर २०२२ ला केंद्र सरकारने ग्रुप १ ते ४ च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ केली. मात्र, सदरची वाढ ६५ टक्के २ वेळेची दुप्पट अर्थात १४० टक्के इतकी वाढ करणे गरजेचे असताना ००, ५, १२ व २२ टक्के एवढीच वाढ करीत बदल हे मार्च २०२६ पर्यंत कायम ठेवले. त्यामुळे २०१० च्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये २०० टक्के वाढ करणे गरजेचे आहे.

टॅग्स :balwant wankhedeबळवंत वानखेडेAmravatiअमरावतीcongressकाँग्रेस