सिमेंट रस्ते बनले पार्किंग प्लेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:52+5:302021-04-22T04:13:52+5:30
--------------------- वरूडच्या मुख्य मार्गांना अतिक्रमणाचा विळखा वरूड : शहरातील राष्ट्रीय महामार्ग, अप्रोच रोड, रिंग रोड, मेन रोड तसेच शहरातील ...

सिमेंट रस्ते बनले पार्किंग प्लेस
---------------------
वरूडच्या मुख्य मार्गांना अतिक्रमणाचा विळखा
वरूड : शहरातील राष्ट्रीय महामार्ग, अप्रोच रोड, रिंग रोड, मेन रोड तसेच शहरातील मुख्य चौकात अतिक्रमण वाढले आहे. अनेक दुकानदारांनी दुकानासमोर टिन शेड लावून वर्दळीची जागा वा फुटपाथची जागा बळकावली आहे. त्या पार्श्वभूमीवर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण व रस्ते खुले करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
---------------
साऊर-तळवेळ रस्त्याची दुरावस्था
टाकरखेडा शंभू : भातकुली चांदूरबाजार तालुक्याची सीमा जोडणाºया साऊर ते तळवेल या दीड किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
वरूडमधील संत्रा उत्पादकांना फटका
पुसला-जरूड : अद्यापही संत्रा झाडावरच असल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापाऱ्यांनासुद्धा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे परप्रांतीय बाजारपेठेत महाराष्ट्र पणन महामंडळाचे कार्यालय उघडणे आवश्यक आहे. संत्र्याचे भाव कोलमडल्याने संत्राउत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट मार्केटिंगची सुविधा होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
----------------
गाविलगड किल्ल्याचे व्हावे जतन
चिखलदरा : ऐतिहासिक व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरास्थित गाविलगड किल्ल्याची वाताहात होत असून त्याला नामशेष होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. गवळीगड ते गाविलगड अशी अनेक स्थित्यंतरे बघणाऱ्या या किल्ल्यात अनेक इतिहासकालीन स्मृती दडल्या आहेत. मात्र कधी निधी तर कधी व्याघ्रप्रकल्पाच्या जाचक अटीत किल्ल्याचे जतन थांबले आहे.
-----------------