एडिफाय स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST2021-08-17T04:18:48+5:302021-08-17T04:18:48+5:30
अमरावती : स्थानिक देवी एजुकेशन सोसायटीद्वारे संचालित एडिफाय स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुरणलाल ...

एडिफाय स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
अमरावती : स्थानिक देवी एजुकेशन सोसायटीद्वारे संचालित एडिफाय स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुरणलाल हबलानी, मुख्याध्यापिका कृष्णा कथुरिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्कूलच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य रवि इंगळे उपस्थित होते. यावेळी पुरणलाल हबलानी यांनी देशासाठी आपले प्राण गमावलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. संचालन संगीता गावंडे आणि वोंडा मेकडोनल्ड यांनी केले. कार्यक्रमासाठी भारत मोंढे, नीरज गावंडे, बिदिशा पात्रा, श्वेता ढवळे, दीबा खान, स्कूलचे एच.आर. सुभान निमसुरवाले व टीम, शैलेश निचत, सतीश बगल्ले, अर्चना भुसारी, योगिता कडू, पल्लवी मोहोड, खेळ विभागातील मनोज कोठेकर व टीम आदींनी अथक परिश्रम घेतले.