बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा 'वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:58+5:30
कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या स्तरावर फिरते पथक राहील. यात (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), निरंतर शिक्षण, डायटचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश राहील. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. हे पथक केंद्रांचे व्हिडीओ चित्रीकरण करून परीक्षा संचालनातील बारकावे कैद करतील.

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा 'वॉच'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उच्च माध्यमिक सिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १८ मार्चपर्यंत या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल महिनाभर इयत्ता बारावीची परीक्षा होत असल्याने उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी ही पहिली पायरी मानून यंदा शहरी भागातील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने शिक्षण बोर्डाने केंद्राधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
बारावी परीक्षेच्या अनुषंगाने कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर प्रात्यक्षिक परीक्षा आटोपल्याची माहिती आहे. १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाºया बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागात प्रश्नपत्रिका पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील शिक्षण मंडळाचा गोपनीय विभाग या कामासाठी सज्ज झाला आहे.
कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या स्तरावर फिरते पथक राहील. यात (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), निरंतर शिक्षण, डायटचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश राहील. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. हे पथक केंद्रांचे व्हिडीओ चित्रीकरण करून परीक्षा संचालनातील बारकावे कैद करतील. अमरावती विभागात बारावीच्या परीक्षेत ४९८ केंद्रांवर १ लाख ५१ हजार ३९२ विद्यार्थी परीक्षार्थी असणार आहेत.
परीक्षा कें द्रांवर ‘तिसरा डोळा’
इयत्ता बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक व्हाव्यात, यासाठी प्रत्येक कें द्रावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याबाबत शिक्षण मंडळाने यापूर्वी नियोजन बैठकीत सूचना केल्या. किंबहुना केंद्राधिकाºयांना परीक्षेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असल्याबाबत पत्र पाठविले आहे.
शहरी भागातील केंद्रांना सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्याचे बंधन आहे. नादुरुस्त असल्यास ते दुरुस्त करावे, अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात मात्र तूर्तास बंधनकारक करता येत नाही. येत्या काळात सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लागणार आहे. जनरेटर आवश्यक करण्यात आले आहे.
- जयश्री राऊत
सहसचिव, शिक्षण मंडळ अमरावती विभाग
महाविद्यालयात केंद्रांवर लागले सीसीटीव्ही
विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या परीक्षेदरम्यान १५७ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्याच धर्तीवर आता बोर्डाच्याही इयत्ता बारावीची परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत घेण्याची तयारी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चालविली आहे.