कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेराचा वॉच

By Admin | Updated: January 4, 2016 00:15 IST2016-01-04T00:15:45+5:302016-01-04T00:15:45+5:30

तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयातील दलालांचा वाढता हस्तक्षेप सोबतच भ्रष्टाचाराची वाढती टक्केवारी रोखण्यासाठी प्रत्येक कार्यालयात सी़सी़टी.व्ही कॅमेरा लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहे़

CCTV Camera Watch at the office | कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेराचा वॉच

कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेराचा वॉच

शासनाचे निर्देश : देहबोलीतून होणार दलालाची ओळख, कर्मचाऱ्यात येणार शिस्त
मोहन राऊत  अमरावती
तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयातील दलालांचा वाढता हस्तक्षेप सोबतच भ्रष्टाचाराची वाढती टक्केवारी रोखण्यासाठी प्रत्येक कार्यालयात सी़सी़टी.व्ही कॅमेरा लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहे़ दरम्यान दिवसभर संबंधित कर्मचारी कोणते काम करतात, याविषयी प्रत्येक क्षण त्यामध्ये टिपले जाणार असून कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे शिस्तीचे धडे आगामी काळात पहायला मिळणार आहे़
तालुकास्तरावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नझूल उपअधीक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालमत्तासंदर्भात खरेदी विक्रीचे व्यवहार चालणारे दुय्यम निंबधक कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी, दुय्यम निंबधक सहकारी संस्था, नगरपरिषद, नगरपंचायत हे कार्यालय येतात़
या कार्यालयातील कामे पध्दतशीरपणे होतात का, कर्मचारी वेळेवर येतात का, तसेच किती कर्मचारी दुपारी दौऱ्याच्या नावावर बाहेर जातात तसेच उपस्थितांची संख्या किती विशेषत: ग्रामीण भागाच्या निगडित असलेल्या पंचायत समिती व शासनाचा सर्वाधिक कर गोळा करण्याचे काम करणाऱ्या तहसील कार्यालयात सी़सी़टीव्ही कॅमेरा लावण्यात आलात का, असा प्रश्न नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात आ़मितेश भांगडीया यांच्यासह अनेक विधानसभा व विधान परिषद संदस्यांनी निर्माण केला होता़ त्वरित या संबंधित कार्यालयात सी़सी़टी.व्ही कॅम्ोरा लावण्यात येणार असल्याचे आश्वासन शासनाने दिले होते़ ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आता प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे़

भ्रष्टाचार रोखण्यास होणार मदत
वाढती लोकसंख्यासोबतच या शासकीय कार्यालयात दिवसानजीक दोन ते तीन प्रकरण या कार्यालयात दाखल होते़ तहसील कार्यालयात पांदन रस्त्यापासून तर सातबारा दुरूस्ती व कूळ हटविण्यापर्यंत प्रकरणे या कार्यालयात येतात़ सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदार देयक काढताना काही व्यवहार होतात़ कृषी अधिकारी कार्यालयात देवाण-घेवाणचा प्रकार चालतो. तसेच नझूल कार्यालयात शेत जमिनीचे मोजमाप करण्यासाठी चिरीमिरीचे व्यवहार होतात. विशेषत: या तालुकास्तरावरील कार्यालयात दिवसेंदिवस दलालांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ त्यामुळे या कार्यालयात सी़सी़टी.व्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत़

कर्मचाऱ्यांना लागणार शिस्त
तालुकास्तरावरील या कार्यालयात बसविण्यात येणाऱ्या सी़सी़टिव्ही कॅमेरात सर्वच कामकाजाची स्थिथी कैद होणार आहे. या कॅमेराची कर्मचाऱ्यांवर करडी नजर राहील. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवावा लागणार आहे़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार आहे़

Web Title: CCTV Camera Watch at the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.