गोवंश वाहून नेणारा कंटेनर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:01:30+5:30
प्राप्त माहितीनुसार, अल्ताफ मोहम्मद चांद खान (३५), निसार खान सुभान खान (४०, दोन्ही रा. प्रतापपुरा, राजस्थान) हे आरोपी आरजे १४ जीएच ४४६२ क्रमांकाच्या कंटेनरमधून गोवंशाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यामधून ३१ बैल निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी अमरावती येथे नेण्यात येत होते. वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांना मंगळवारी दुपारपासून शहरात कंटेनरसाठी सापळा रचला.

गोवंश वाहून नेणारा कंटेनर पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : राजस्थानातून गोवंश वाहून आणणाऱ्या कंटेनरचा पाठलाग करून वरूड पोलिसांनी गोवंश तस्करी उघडकीस आणली. ३१ जनावरे व ८८ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जंगलाच्या दिशेने पोबारा करणाºया चालक-वाहकाला स्थानिकांच्या मदतीने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, अल्ताफ मोहम्मद चांद खान (३५), निसार खान सुभान खान (४०, दोन्ही रा. प्रतापपुरा, राजस्थान) हे आरोपी आरजे १४ जीएच ४४६२ क्रमांकाच्या कंटेनरमधून गोवंशाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यामधून ३१ बैल निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी अमरावती येथे नेण्यात येत होते. वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांना मंगळवारी दुपारपासून शहरात कंटेनरसाठी सापळा रचला. रात्री १०.३० वाजता सदर कंटेनर जायंट्स चौक परिसरातील श्रीकृपा बारसमोर पोहोचताच पोलिसांनी पकडला. यावेळी चालक व वाहक जंगलाच्या दिशेने पळून गेले. कंटेनरमधील ३१ बैलांना बाहेर काढून कामधेनू गोरक्षणच्या ताब्यात देण्यात आले.
ठाणेदार मेहते यांनी स्थानिक युवकांसह आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. ४ लाख ६५ हजार रुपयांची जनावरे, ४० लाखांचा कंटेनर व रोख ८८ हजार रुपये जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ (१) (ड), ११ (१) (इ), ११ (१) (एफ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११९, मोटार वाहन अधिनियम १९५४ कलम १७७, ६६,१९२ आणि महाराष्ट्र प्राणीसंरक्षण (सुधारणा), अधिनियम १९९५ चे कलम ५ अ, ९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार मगन मेहते, एपीआय संघराक्षक भगत, हेमंत चौधरी, पीएसआय हिवसे, श्रीराव, सचिन भाकरे, मिलिंद वाटणे, जगदीश खानवे यांनी केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड, बजरंग दलाचे नितीन कुबडे, विक्रम काळे, सुनीत घारपुरे, माधव प्रधाने, आकाश बगाडेसह गोरक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य केले.