अमरावती शहरात पोलिसांनी पकडली रोकड; दोन कोटी असण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:49 IST2021-07-27T11:48:53+5:302021-07-27T11:49:17+5:30
Amravati News स्थानिक राजापेठ पोलिसांनी मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास फरशी स्टाफ परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनातून मोठी रोकड पकडली.

अमरावती शहरात पोलिसांनी पकडली रोकड; दोन कोटी असण्याची शक्यता
ठळक मुद्देमोजदाद सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक राजापेठ पोलिसांनी मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास फरशी स्टाफ परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनातून मोठी रोकड पकडली. याप्रकरणी तूर्तास तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तीन मशीनद्वारे रकमेची मोजदाद सुरू आहे. प्रथमदर्शनी ती रक्कम दोन कोटी रुपयांच्या घरात असावी, अशी शक्यता राजापेठ पोलिसांनी व्यक्त केली आहे. पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत ही मॅराथॉन कारवाई सुरू होती. याप्रकरणी फरशी स्टाप परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटची राजापेठ पोलिसांनी सुमारे एक तास झाडाझडती घेतली.