शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाने पैशासाठी चिमुरड्यांना बसमधून उतरविले

By admin | Updated: September 25, 2014 23:16 IST

येथील इंग्रजी शाळेत नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंत शिकणाऱ्या चार आदिवासी चिमुुकल्यांकडे तिकिटासाठी आठ रुपये नसल्याने एसटी वाहक नरेंद्र रसाळे याने दारुच्या नशेत सोमवारी चिमुकल्यांना मारहाण

राजेश मालविय - धारणीयेथील इंग्रजी शाळेत नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंत शिकणाऱ्या चार आदिवासी चिमुुकल्यांकडे तिकिटासाठी आठ रुपये नसल्याने एसटी वाहक नरेंद्र रसाळे याने दारुच्या नशेत सोमवारी चिमुकल्यांना मारहाण करुन कुसुमकोट येथे भररस्त्यात बसमधून उतरविल्याची घटना घडली. यामुुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुख्याध्यापकाकडूनही एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहकावर कारवाई करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.तालुक्यातील १२ किमी अंतरावरील धोदरा येथील आदिवासी चिमुकले प्रतिभा मांगीलाल कास्देकर (४), प्रभात कास्देकर (८), प्रतीक्षा कास्देकर (१०), रितीक (११) हे चारही विद्यार्थी धारणी येथील डब्ल्यू.पी. वर्धे इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी कधी खासगी व एसटी बसमध्ये दररोज ये-जा करतात. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजाता शाळा सुुटल्यानंतर विद्यार्थी बसस्थानकावरील परतवाडा आगाराची शेड्युल क्र.१०६, एम.एच.४०- ८८७१ धारणी ते झिलांगपाटी बसमध्ये गावात जाण्यासाठी बसले. जवळच्या कुसुमकोट येथे वाहक नरेंद्र रसाळे याने चिमुकल्यांना तिकीट मागितले. मात्र ८ रुपये नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगताच वाहकाने चिडून प्रभात कास्देकर या आदिवासी विद्यार्थ्याला कानशीलात हाणली. बसमधील आदिवसी प्रवाशांनी वाहकाला समजाविण्याचा प्रयत्न केला. तरीही वाहकाने भर रस्त्यात कुसुमकोट मार्गावर शाळकरी चिमुकल्यांना तिकीट नसल्याचे कारण सांगून मारहाण करुन बसमधून उतरुन दिल्याचे या चिमुरड्यांचे म्हणणे आहे. वाहकाचा चीड आणणारा हा प्रकार पालकांच्या लक्षात येताच त्यांनी २३ सप्टेंबर रोजी धारणी पोलीस ठाण्यात वाहक रसाळेने मारहाण करुन रस्त्यात चिमुकल्यांना उतरुन दिल्याची लेखी तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे. याची गंभीर दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनीही या वाहकाची तक्रार धारणी वाहतूक नियंत्रकासह परतवाडा, अमरावती विभाग नियंत्रकाकडे केली आहे.