ट्रकच्या धडकेत कारचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 21:34 IST2023-04-06T21:33:26+5:302023-04-06T21:34:49+5:30
Amravati News विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रकसोबत कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी ३.३० ते चारच्या सुमारास घडला.

ट्रकच्या धडकेत कारचालक ठार
प्रदीप भाकरे
अमरावती : विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रकसोबत कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी ३.३० ते चारच्या सुमारास घडला. नितीन वामनराव हजारे (४२, रा. अंबा कॉलनी, तपोवन, अमरावती) असे मृताचे नाव आहे. तपोवन परिसरात हा अपघात घडला.
नितीन हजारे नागपूर येथे कारागृह पोलिस म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दुपारी हजारे हे त्यांच्या कारने शहरातील बियाणी चौकाकडून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी मार्डी मार्गावर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरासमोर हजारे यांच्या कारची विरुध्द दिशेने येणाऱ्या सिमेंट मिक्सर घेऊन येणाऱ्या ट्रकसोबत धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा दर्शनी भाग मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला होता. यामध्ये नितीन हजारे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव त्यांच्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते.