शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

चिखलदऱ्याच्या दरीत कार कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:45 PM

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या मित्र-मैत्रिणींची भरधाव कार सेमाडोह मार्गावरील आमाडोहनजीक ६० फूट खोल दरीत कोसळली. यात अमरावती येथील १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. चालकाविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देचालकाविरुद्ध गुन्हा : अमरावतीच्या सलोनी गोडबोलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या मित्र-मैत्रिणींची भरधाव कार सेमाडोह मार्गावरील आमाडोहनजीक ६० फूट खोल दरीत कोसळली. यात अमरावती येथील १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. चालकाविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सलोनी रमेश गोडबोले (रा. पूजा कॉलनी, अमरावती) असे मृत युवतीचे नाव आहे. रविवारी सकाळी नयन शंकर भुसारे (रा. शंकरनगर), सुशील सुभाष कडू (रा. बोंडे ले-आऊट), योगंद्र राजेंद्र वैराळे (रा. एमआयडीसी रोड, अमरावती), आशिष सुरेंद्र मोहोळ (रा. टीटीनगर व अभिलाष सुरेंद्रसिंग येवतीकर (रा. शंकरनगर) असे एकूण सहा जण कार क्रमांक एम एस २७ डी एल ०३४१ ने चिखलदरा येथे रविवारी अमरावतीहून फिरायला आले होते. दिवसभर पर्यटनस्थळावर फिरून विविध स्थळांची पाहणी करून रात्री ८ वाजतादरम्यान सेमाडोह येथे जात असताना भरधाव चारचाकी वाहन ६० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात सलोनी गोडबोले हिचा मृत्यू झाला. आशिष मोहोळ हा जखमी झाला. कारमधील उर्वरित कुणालाही दुखापत दुखापत झाली नाही.अपघाताची माहिती मिळताच चिखलदºयाचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी रविवारी रात्रीच पोलीस पथकासह घेऊन घटनास्थळ गाठले. सुरेखा रमेश गोडबोले (४०, रा, पूजा कॉलनी अमरावती) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिलाष येवतीकरविरुद्ध निष्काळजीपणे भरधाव वाहन चालून अपघात घडवून आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.शनिवार, रविवारी हजारो पर्यटकांची गर्दीपावसाळ्याचे दिवस पाहता विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर शनिवार, रविवारी या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक हजेरी लावतात. घाट वळणाच्या या मार्गावर पर्यटक बेदरकारपणे वाहन चालवीत असल्याचे चित्र आहे. अपघातात मृत सलोनी गोडबोले हिचे चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह परिजनांच्या स्वाधीन करण्यात आले. कारमध्ये आसन क्षमता कमी असतानाही सात जण बसले होते, हे विशेष.सेमाडोह मार्गावर कार दरीत कोसळून अपघातात एक तरुणी ठार झाली. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- आकाश शिंदे, ठाणेदार, चिखलदरा