शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली; एक ठार, चार जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 19:57 IST

भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते अमरावतीत सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते.

अमरावती - भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते अमरावतीत सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कटक (२८, रा. सांगली), आकाश कश्यप (२६) व तुषार मुरलीधर भुतडा (२८, रा. साईनगर) अशी जखमींची नावे आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मीडिया सर्व्हिसेसचे काही अधिकारी व कर्मचारी अमरावतीत सर्वेक्षणासाठी आले. ते गडगडेश्वर परिसरातील एका मित्राच्या खोलीवर थांबले होते. शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ते आपली कामे आटोपून कार (एमएच २७ एबी-०००९) ने इर्विन चौकात पोहोचले. त्यांनी चालकास सिगारेट घेण्यासाठी इर्विन चौकातील पानटपरीवर पाठविले. सिगारेट न मिळाल्याचे पाहून चालकास तेथेच सोडून शाहू भोसले याने कारचा ताबा घेत जयस्तंभ चौकाच्या दिशेने भरधाव नेली. जयस्तंभकडून राजकमल चौकाकडे वळण घेत असताना भरधाव कारचा अचानक टायर फुटला आणि कार श्याम चौकातील उड्डानपुलाच्या पिलरला जाऊन आदळली. कार चालविणारा शाहू जागीच ठार झाला, तर सोबतचे चौघेही जखमी झाले. काही अंतरावर असणारे कोतवालीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. कोतवाली पोलिसांनी मृतकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.  खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची आ. रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी शनिवारी भेट घेतली.

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या