चमक सोसायटीवर प्रहारचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:16+5:302021-07-07T04:15:16+5:30
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका लागल्या असून, चमक बुद्रुक सेवा सहकारी सोसायटीत जिल्हा मध्यवर्ती बँक ...

चमक सोसायटीवर प्रहारचा कब्जा
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका लागल्या असून, चमक बुद्रुक सेवा सहकारी सोसायटीत जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून दीपक पाटील यांची निवड झाली.
चमक सेवा सहकारी सोसायटीत एकूण १३ सदस्य असून, सात मते त्यांना मिळाली. त्यांच्या बाजूने दिलीप खेरोडकर, उमेश खेरोडकर, मेघशाम भोंडे, विलास जाणे, शारदाबाई पाटील, काशीनाथ सातंगे. सुभद्राबाई सातंगे यांनी मतदान केले. दीपक पाटील यांनी शुभांगी राजीव पाटील यांचा पराभव केला. सचिव महेंद्र मिसळकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. दीपक पाटील यांच्या निवडीबद्दल बबलू चरोडे, नरेंद्र सातगे, मनोहर पाटील, रवींद्र सातंगे. प्रदीप पाटील, संदीप खेरोडकर, एक ग्रामपंचायत सदस्य सुनंदा नांदगे, विजय पाटील व प्रहार कार्यकर्त्यांनी कौतुक केले.