शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

आजपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज, राजकारण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 12:41 IST

आठ मतदारसंघांत निवडणूक प्रक्रिया : पाच जणांनाच प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : निवडणुकीसाठी मंगळवारी विधानसभा (दि.२२) पासून उमेदवारी अर्जाला सुरुवात होत आहे. अर्ज सादर करताना उमेदवारासह केवळ पाच जणांनाच कक्षात प्रवेश राहणार आहे तर १०० मीटर आवारात तीन वाहनांना प्रवेश राहणार असल्याने अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी दुपारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामाचा दूर दृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. सरमिसळ केल्यानंतर मतदानयंत्र संबंधित विधानसभा क्षेत्रात आजपासून पाठविण्यास सुरुवात करण्यात आली. 

अमरावती आणि बडनेरा मतदारसंघाच्या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येत असलेल्या कार्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. अमरावती मतदारसंघासाठी तालुका प्रशासकीय भवनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात. खर्च आणि परवानग्यांची योग्य माहिती देण्यात यावी. उमेदवारांना अर्ज, नमुने आणि आवश्यक त्या सूचना एकाचवेळी देण्यात याव्यात. परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही कटियार यांनी दिले. विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने राजकीय वातावरणही तापणार आहे.

निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज स्वीकृती : २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्जाची छाननी : ३१ ऑक्टोबर उमेदवारी अर्जाची माघार : ०४ नोव्हेंबर उमेदवारी चिन्ह वाटप : ०४ नोव्हेंबर मतदान : २० नोव्हेंबर मतमोजणी : २३ नोव्हेंबर

प्रत्येक मतदारसंघात २५ टक्के अधिक इव्हीएम जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत २७०८ मतदान केंद्र राहणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांच्या २५ टक्के अधिक मतदान यंत्र उपलब्ध झाले आहे. मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी केली आहे. ही मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे. सरमिसळनंतर या मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप आजपासून लोकशाही भवनातून सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघाला २० टक्के अधिक मतदान यंत्रे वाटप करण्यात आली आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती