शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात संमिश्र बंद, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM

जमावाने मालवीय चौकातील प्रतिष्ठाने बंद करताना तुरळक दगडफेक केली. स्थानिक इर्विन चौकात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासूनच समर्थकांची गर्दी जमली होती. शहरातील चित्रा चौक ते पठाण चौकापुढे मुस्लिमबहुल भागातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद होती. चपराशीपुरा परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तथापि, शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबहुजन क्रांती मोर्चाचा पुढाकार : मालवीय चौकातील प्रतिष्ठानांवर तुरळक दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने लागू केलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व दुारुस्ती (सीएए), नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) या कायद्याविरूद्ध बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला अमरावतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील इर्विन चौकात निदर्शने करून या कायद्याचा कडाडून विरोध नोंदविला. जमावाने मालवीय चौकातील प्रतिष्ठाने बंद करताना तुरळक दगडफेक केली.स्थानिक इर्विन चौकात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासूनच समर्थकांची गर्दी जमली होती. शहरातील चित्रा चौक ते पठाण चौकापुढे मुस्लिमबहुल भागातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद होती. चपराशीपुरा परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तथापि, शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे.दरम्यान, इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तास, दोन तासांत गर्दी हजारोंच्या संख्येत झाली. यानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, क्यूआरटी पथक, डीबी स्क्वॉड, गाडगेनगर, शहर कोतवाली व वाहतूक पोलीस शाखा आदी यंत्रणेने मार्चेकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इर्विन चौकात ठिय्या दिला. मात्र, बंदच्या अनुषंगाने एकवटलेल्या गर्दीचा फटका इर्विन चौकातील वाहतुकीला बसला. येथून होणारी वाहतूक सकाळी ११ नंतर वळविण्यात आली. ती सायंकाळपर्यंत तशीच ठेवण्यात आली. बहुजन क्रांती मोर्चाचे सुनील डोंगरदिवे, विवेक कडू, पंचशीला मोहोड, प्रफुल्ल गवई, भीम आर्मीचे अकबर खान, उलेमा संघटनेचे हाफीज नाजीम, मौली अब्दुल्ला, मुश्कीफ अहमद हाफीज, उलमा हजरात आदींनी धुरा सांभाळली.अर्धनग्न आंदोलनातून‘हमे चाहिये आझादी...’बंदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक इर्विन चौकात एकत्रित आलेल्या मुस्लिम बांधवांपैकी काही युवकांनी अर्धनग्न आंदोलनाद्वारे ‘हमे चाहिये आझादी’ अशी जोरदार नारे देत लक्ष वेधले. यावेळी युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात नारेबाजी देण्यात आली. ‘सीएए’, ‘एनआरसी’ रद्द करण्याच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. ‘डीएनए’च्या आधारावर ‘एनआरसी’ लागू करण्याची मागणी करण्यात आली.मालवीय चौकात तुरळक दगडफेकइर्विन चौकात एकत्रित आल्यानंतर जमावाने मालवीय चौकातील दुकाने बंद करण्यासाठी त्या दिशेने धाव घेतली. डफरीन रुग्णालय वळणमार्गालगतची काही दुकाने बंद करण्यासाठी आंदोलकांनी दगडफेक केली. यात कोणत्याची प्रकारने नुकसान झाले नाही. परंतु, काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली. अवघ्या १० मिनिटांतच मालवीय चौक ते इर्विन मार्गावरील दुकाने बंद झाली, हे विशेष.वाहने उचलण्याची कारवाई होेताच उडाला गोंधळस्थानिक इर्विन चौकात बंदच्या समर्थनार्थ एकवटलेल्या नागरिकांनी त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभे केली होती. काही वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्यामुळे शहर वाहतूक शाखेने ती उचलण्यासाठी वाहन बोलावले. जमावाने प्रचंड विरोध केला व पोलिसांच्या वाहनापुढे निदर्शने केली. अखेर रस्त्यालगतची वाहने न उचलता सदर वाहन रिकामे परतले. त्यानंतर जमावाने एकच जल्लोष केला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद