ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दबलल्याने कार रेल्वे ट्रॅकवर, समय सुचकतेने अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 22:03 IST2022-11-18T22:02:34+5:302022-11-18T22:03:35+5:30
स्थानिक रेल्वे स्टेशन व रेल्वे फाटकादरम्यान असलेल्या रेल्वे क्वॉर्टरसमोर उभी असलेली कार क्र एम. एच. ४६ पी. १३५४ ला चालक नितीन सडमाके मागे-पुढे करीत असतानाच चुकीने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दबल्या गेले व कार अनियंत्रित होऊन पुढे असलेल्या अप साइडच्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभी राहिली.

ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दबलल्याने कार रेल्वे ट्रॅकवर, समय सुचकतेने अनर्थ टळला
अमरावती: येथील रेल्वे क्वॉर्टरजवळ शुक्रवारी दुपारी अनवधानाने एक कार अनियंत्रित होऊन रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबली. यादरम्यान या रेल्वे रुळावरून कोणतीही रेल्वेगाडी पास न झाल्याने, तसेच आरपीएफ व अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने अनर्थ टळला.
स्थानिक रेल्वे स्टेशन व रेल्वे फाटकादरम्यान असलेल्या रेल्वे क्वॉर्टरसमोर उभी असलेली कार क्र एम. एच. ४६ पी. १३५४ ला चालक नितीन सडमाके मागे-पुढे करीत असतानाच चुकीने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दबल्या गेले व कार अनियंत्रित होऊन पुढे असलेल्या अप साइडच्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभी राहिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले व आरपीएफ तसेच अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांतच ती कार रेल्वे रुळावरून उचलून बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. योगायोगाने दुपारी २.५३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेदरम्यान अप साइडच्या दिशेने कोणतीच रेल्वेगाडी पास झाली नाही, हे येथे उल्लेखनीय, आरपीएफने घटनेची दखल घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.