७५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल, तहसीलदारांद्वारा उद्या नोटीफिकेशन
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2023 16:02 IST2023-04-16T16:02:32+5:302023-04-16T16:02:50+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्यपदांसाठी संबंधित तहसीलदार यांच्याद्वारा मंगळवारी पोनिवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ...

७५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल, तहसीलदारांद्वारा उद्या नोटीफिकेशन
अमरावती : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्यपदांसाठी संबंधित तहसीलदार यांच्याद्वारा मंगळवारी पोनिवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर २५ एप्रिलपासून उमेदवारी अर्जास सुरुवात होत आहे. या निवडणूक निमित्ताने ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा घमासान होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने समर्थीत आयोगाच्या शिफारशीनूसार नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा निश्चित करावयाच्या टक्केवारीची शिफारस केलेली आहे. त्यानूसार अतिरिक्त ठरत असलेली पदे ही सर्वसामान्य प्रवर्गात अधिसूचित होणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतमध्ये १३ एप्रिलला ग्रामसभा घेण्यात येऊन आरक्षण निश्चित करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींचे क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे.या पोटनिवडणुकीत दोन थेट सरपंच्यासह ११४ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. यावेळी जात राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जसोबत हमीपत्र लावण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. पोटनिवडणुकीसाठी १८ मे रोजी मतदान व १९ ला मतमोजणी होणार आहे.