बस ठाण्यात, पोलिसांनी घेतली प्रवाशांची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:45+5:30

आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिसांनी प्रत्येक प्रवासी व बॅगची तपासणी केली. मात्र, कुणाकडेही मंगळसूत्र आढळले नाही.

At the bus station, police conducted a search of the passengers | बस ठाण्यात, पोलिसांनी घेतली प्रवाशांची झडती

बस ठाण्यात, पोलिसांनी घेतली प्रवाशांची झडती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती बस स्थानकाहून एसटी बसमध्ये चढलेल्या एका प्रवासी महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. ही बाब निदर्शनास येताच चालकाने बस गाडगेनगर ठाण्यात लावली. येथे प्रत्येक प्रवाशाची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. बुधवारी दुपारी हा घटनाक्रम घडला.
अमरावती येथे उपचारासाठी आलेल्या स्वाती विजय अटाळकर (२६, रा. माहुली धांडे) या बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अकोटकडे जाणाऱ्या एमएच ४० एन ९३१० क्रमांकाच्या एसटी बसमध्ये चढल्या. आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिसांनी प्रत्येक प्रवासी व बॅगची तपासणी केली. मात्र, कुणाकडेही मंगळसूत्र आढळले नाही. मंगळसूत्र उडविल्याची बाब बसस्थानकावर लक्षात आल्याने शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादीचे बयाण नोंदविण्याची कार्यवाही वृत्त लिहिस्तोवर सुरू होती.

प्रवाशांची ना-हरकत
आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या महिलेने मंगळसूत्र गमावल्याने प्रवाशांनीही तपासणीला हरकत घेतली नाही. उपनिरीक्षक गणेश अहिरे, जयसेन वानखडे, भारती इंगोले यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला.

बसचा दोन ठाण्यात प्रवास
चोरीच्या घटनेमुळे बसमधील प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. सदर बस चालकाने प्रथम गाडगेनगर ठाण्याच्या आवारात नेली, तर त्यानंतर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
 

Web Title: At the bus station, police conducted a search of the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर