शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसची दुचाकीला धडक, दोन ठार

By admin | Updated: May 18, 2015 00:12 IST

अमरावतीवरुन - दर्यापूरकडे जाणाऱ्या भरधाव खासगी बस चालकाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण ..

एक गंभीर : संतप्त जमावाकडून बसची नासधूसदर्यापूर : अमरावतीवरुन - दर्यापूरकडे जाणाऱ्या भरधाव खासगी बस चालकाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अमरावती-दर्यापूर मार्गावरील आराळा ते लाखापूर मार्गावर झाला. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीस्वारांचे डोके चेंदामेंदा झाले होते. नाजुकराव रायभान हिवराळे (६० रा. नायगाव), दिलीप गोविंद हिवराळे (४२, रा.नायगाव) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमीची ओळख मात्र वृत्तलिहेस्तोवर पटली नव्हती. नाजुकराव हिवराळे व दिलीप हिवराळे हे दोघेही लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी मुर्तिजापूरला गेले होते. लग्न आटोपून गावाकडे परतत असताना आराळा ते लखापूर मार्गावर एसटीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एम.एच.२७ए.एच.५९२२ असून खासगी लक्झरी बसचा क्रमांक एम.एच.२७ए-९१३१ असा आहे. घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशीष इंगळे व दर्यापूरचे ठाणेदार जे.के. पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)