जळालेला तो युवक अलहिलाल कॉलनीतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST2021-03-05T04:14:13+5:302021-03-05T04:14:13+5:30

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील चांगापूर मार्गावरील ऑर्चिड शाळेनजीकच्या पडीक शिवारात एका युवकाचा पूर्ण जळालेल्या अवस्थेत मृतदेह बुधवारी सकाळी ...

The burnt youth is from Alhilal Colony | जळालेला तो युवक अलहिलाल कॉलनीतील

जळालेला तो युवक अलहिलाल कॉलनीतील

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील चांगापूर मार्गावरील ऑर्चिड शाळेनजीकच्या पडीक शिवारात एका युवकाचा पूर्ण जळालेल्या अवस्थेत मृतदेह बुधवारी सकाळी आढळला. नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर तो ठाणे हद्दीतील अलहिलाल कॉलनीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मो. अनिस मो. युनिस (४०, रा. अलहिलाल कॉलनी) असे मृताचे नाव आहे. त्याला चार मुली असून, तो गत ७ ते ८ वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली. त्याने नैराशातून आत्महत्या केली की, त्याचा घातपात झाला, या दिशेने गाडगेनगर पोलीस तपास करीत आहे. शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. सदर युवक यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे मॅकेनिकचा व्यवसाय करायचा. तो लॉकडाऊनमध्ये अमरावतीला आला होता, असेही पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.

कोट

सदर युवकाची ओळख नातेवाईकांव्दारे पटली. तो अलहिलाल कॉलनीतील रहिवासी आहे. मृत्यूचे कारण लवकरच कळेल. त्या दिशेने तपास सुरू आहे.

- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

Web Title: The burnt youth is from Alhilal Colony