एसटी-दुचाकी यांच्यात धडक; वडिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 22:51 IST2019-10-29T22:50:58+5:302019-10-29T22:51:21+5:30
धाराकोट येथील सुनील लक्ष्मण कासदेकर हे त्यांचा मुलगा साहिल (७) याच्यासोबत दुचाकीने धारणी ते साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गाने भंवर गावाकडे जात होते. यादरम्यान साद्राबाडी गावाजवळील लंगडाबाबा मंदिराजवळ धारणीकडे येत असलेली एसटी बस व दुचाकी समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकल्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

एसटी-दुचाकी यांच्यात धडक; वडिलांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडील ठार, मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. सुनील लक्ष्मण कासदेकर (३५, धाराकोट) असे मृताचे नाव आहे. साद्राबाडी गावालगतच्या लंगडाबाबा मंदिराजवळ हा अपघात घडला.
धाराकोट येथील सुनील लक्ष्मण कासदेकर हे त्यांचा मुलगा साहिल (७) याच्यासोबत दुचाकीने धारणी ते साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गाने भंवर गावाकडे जात होते. यादरम्यान साद्राबाडी गावाजवळील लंगडाबाबा मंदिराजवळ धारणीकडे येत असलेली एसटी बस व दुचाकी समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकल्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त बाप-लेक घटनास्थळी विव्हळत पडले होते. यादरम्यान एका वाटसरूने ॉअपघाताची माहिती साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक पन्नालाल वाघमारे यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.
सुनील कासदेकर यांच्या छाती, डोके व पायाला जबर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर साहिल याच्यावर उपचार सुरू आहेत.
माझ्या बाबांना वाचवा!
रुग्णवाहिका चालक पन्नालाल वाघमारे यांनी घटनास्थळावर पडून असलेल्या सुनील व चिमुकला साहिल यांना उपचाराकरिता उचलून वाहनात टाकले. त्यावेळी चिमुकल्या साहिलने माझ्याआधी बाबांना उचला, त्यांचा जीव वाचवा, अशी आर्जव केली.
दुचाकीचालक हा मद्यप्राशन केलेला होता. त्याची दुचाकी त्याच्याकडून सांभाळली नाही. मी बस थांबविल्यावरही त्याने बसला धडक दिली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बस पोलीस ठाण्यात आणली.
- मो. इकबाल अ. सत्तार
एसटी बसचालक