शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

१२० दिवसांनंतर बीटीच्या जनुकीय शक्तीत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 22:54 IST

बीटी कपाशी १२० दिवसांची झाल्यानंतर तिच्यात अंगभूत असलेल्या जनुकांची परिणामकारकता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते.

ठळक मुद्दे‘आयएससीआय’ संस्थेची माहिती : बोंडअळीचे जीवनचक्राचा ब्रेक महत्त्वाचा

आॅनलाईन लोकमतअमरावती : बीटी कपाशी १२० दिवसांची झाल्यानंतर तिच्यात अंगभूत असलेल्या जनुकांची परिणामकारकता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते. त्यामुळे बीटीअंगी गुलाबी बोंडअळीला प्रतिकार करण्याची कमी होते व पीक किडीला बळी पडते. किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वास्तव ‘आयएससीआय २२व एसएबीसी’ संस्थेच्या अहवालात स्पष्ट आहे.मध्य विभागात कपाशी शेवटच्या तोड्यानंतर थांंबविण्याऐवजी एप्रिल-मेपर्यंत उत्पादनक्षम ठेवले जाते. हे आर्थिक फायद्याचे असले तरी त्यामुळे कपाशीची वर्षानुवर्षे उत्पादनातील शाश्वतताच संपविण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळी थंडीच्या कालावधीतील कीड आहे. राज्यात तिचा उद्रेक आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होतो व किडीमुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान होते, जे टाळता येऊ शकते, जानेवारीनंतर ही कीड पीक नसताना त्यांच्या अवशेषामध्ये कोषावस्थेत असते. मात्र, जानेवारीनंतर पीक उपलब्ध असल्यास ही अळी कोषावस्थेत न जाता नव्याने येणाºया बोंडावर उपजीविका करते. त्यामुळे अळीचे जीवनचक्र नष्ट करण्यासाठी कपाशीची फरदड न घेणेच फायद्याचे आहे.रेफ्यूजी पिकांची लागवड न करणे हे गुलाबी बोंडअळीत बीटी प्रतिकारकता वाढविण्याचे मुख्य कारण आहे. एक तर शेतकºयांनी लागवडीकडे दुर्लक्ष केले किंवा कमी प्रमाणात लागवड केली. यामुळे अळी कायमच बीटी कपाशीच्या संपर्कात राहून त्यात बीटी प्रतिकारकता विकसित झाली. गुलाबी बोंडअळी ही एकाच पिकावर (मोनोफॉस) गुजराण करणारी आहे, तर उर्वरित प्रकारच्या बोंडअळ्या अनेक पिकांवर किंवा वनस्पतीवर जगत असतात. एकच पीक सतत उपलब्ध असल्यानेही गुलाबी अळीत प्रतिकारक्षमता वेगाने विकसित झाली असल्याचे या पुस्तिकेत स्पष्ट केले आहे.बीटीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब ही महत्त्वाची बाब आहे. उन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्यामुळे बोंडअळी उन्हात उघडी पडून मरते. कोष उघडे पडल्यावर पक्षी ते नष्ट करतात.मान्सूनच्या पेरणीनंतर पेरणी, कामगंध सापळ्यांचा वापर कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर हंगाम उशिरापर्यत न लांबविणे पिकांच्या अवशेषाचा उन्हाळ्यातच नायनाट करणे तसेच कापसाची साठवणूक व्यवस्थत केली नाही, तर त्यातुनही तग धरून तिचे जीवनचक्र सुरू राहण्याची भीती आहे.बोंडअळीला उपलब्ध असणारी रेफ्युजी पिकेअमेरिकन बोंडअळी अनेक पिकांवर जगते. तिला चवळी, हरभरा, सूर्यफूल मका , बाजरी, टोमॅटो पर्यायी खाद्य पीक आहे.ठिपक्यांची बोंडअळी काही पिकांवर जगते. यासाठी कपाशी आणि भेंडी पर्यायी पिके आहेत.गुलाबी बोंडअळी ही एकाच पिकावर जगते. तिला पर्यायी खाद्य नाही. मात्र, भेंडी हे यजमान पर्यायी आहे.तंबाखूची पाने खाणारी अळी अनेक पिकांवर गुजराण करते. तिला भाजीपाला, सोयाबीन व एरंडी पर्यायी पीक आहे.