‘बीएसएनएल’चे कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:49 IST2019-03-27T21:48:51+5:302019-03-27T21:49:15+5:30
आर्थिक वर्ष संपायला चार दिवस बाकी असताना, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. महापालिकेचा ४ लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकीत असल्याने बीएसएनएलचे यशोदानगर मार्गावरील कार्यालय बुधवारी सील करण्यात आले. वसुली पथकाद्वारे ही धडक कारवाई करण्यात आली.

‘बीएसएनएल’चे कार्यालय सील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिक वर्ष संपायला चार दिवस बाकी असताना, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. महापालिकेचा ४ लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकीत असल्याने बीएसएनएलचे यशोदानगर मार्गावरील कार्यालय बुधवारी सील करण्यात आले. वसुली पथकाद्वारे ही धडक कारवाई करण्यात आली.
महापालिका क्षेत्रात यंदाच्या आर्थिक वर्षात ४३ कोटी २३ लाखांची मागणी आहे. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात अधिकाधिक वसुली करण्यासाठी मालमत्ता कर विभागाद्वारे आता धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. लाखो रुपये मालमत्ता कर प्रलंबित असल्यामुळे शहरातील डझनावरी मोबाइल टॉवर सील करण्यात आले आहेत.
यशोदानगर मार्गावरील बीएसएनएलचे कार्यालयदेखील ४.८७ लाखांच्या करवसुलीसाठी बुधवारी सील करण्यात आले. सहा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकप्रमुख एस.जी. पकडे, निरीक्षक जी.एन. कोल्हटकर, एस.एस. देशमुख, बी.एम. देशमुख आदी अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले.