शहरं
Join us  
Trending Stories
1
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
2
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
3
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार
5
PHOTOS : नेपाळच्या 'युवा' संघाचा झंझावात; आफ्रिकेने तोंडचा घास पळवताच अश्रू अनावर
6
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
7
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
8
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
9
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
10
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
11
दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
12
दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास
13
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
14
"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 
15
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र
16
केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार
17
परस्पर संवाद, मुत्सद्देगिरीतूनच शांततेचा मार्ग जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान
18
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
19
शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष गायब, हाडे सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली
20
सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

‘बीएसएनल’ची महाकृषी सेवा महागली

By admin | Published: November 04, 2015 12:20 AM

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकृषी एक...

शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री : १ नोव्हेंबरपासून लागू, १४१ रुपये मोजावे लागणार अमरावती : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकृषी एक आणि दोन यांच्या सीयूजी कॉलिंग सुविधेत आता महाकृषी तीन या सुविधेचा समावेश करून एकत्र सीयूजी प्लॅन तयार करण्यात आला आहे. ही सुविधा १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली. यामध्ये समाविष्ट ग्राहक ‘अनलिमिटेड’ बोलू शकणार आहे. मात्र यासाठी आता १०८, १०९ व १२८ रुपयांऐवजी १४१ रुपये मोजावे लागणार असल्याने शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे. राज्यात बिएसएनएलचे कृषी प्लॅन अंतर्गत १२ लाख ग्राहक आहेत. जिल्ह्यात बीएसएनएलचे दीड लाख ग्राहक आहेत. यापैकी किसान प्लॅन अंतर्गत ३५ हजार ग्राहक आहेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढावा, कमी खर्चात समन्वय साधला जावा, या हेतूने बीएसएनएलने सुरू केलेल्या ‘मोबाईल टू मोबाईल फ्री’ या महाकृषी संचार सुविधेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याबाबतच्या तीनही योजनांचे समायोजन करून नव्या स्वरुपात ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यातील १२ लाख शेतकरी आता एकमेकांशी मोफत संवाद साधू शकणार आहेत. शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, खते बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेबाबत येणाऱ्या अडचणी, कृषी विभागांच्या विविध योजनांची माहिती त्वरित कमी खर्चात मिळावी, यासाठी सर्वात महत्त्वाची ‘क्लोज युजर ग्रुप’ (सीयुजी) भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यासाठी ‘भारत संचार निगम या कंपनीची निवड करण्यात येऊन २०११ पासून ही सेवा सुरू आहे. मात्र या तिन्ही सेवा एकत्रित करून शुल्कात वाढ करण्यात आली व डेटादेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. (प्रतिनिधी)