शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

केबल तोडल्याने बीएसएनएल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 10:40 PM

चौधरी चौकातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात बीएसएनएल केबल तोडल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच इंटरनेटसह दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने केबल तोडल्याचा आरोप बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देपीडब्ल्यूडी, कंत्राटदारावर आरोप : अमरावती, यवतमाळ, अकोल्याची सेवा विस्कळीत, नागरिकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चौधरी चौकातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात बीएसएनएल केबल तोडल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच इंटरनेटसह दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने केबल तोडल्याचा आरोप बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. केबल तुटल्यामुळे अर्धे अमरावती शहर, संपूर्ण ग्रामीण भागासह यवतमाळ व अकोला शहरातील बीएसएनएल सेवा ठप्प झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.चौधरी चौक ते विलासनगरपर्यंत सिमेंट रस्त्यातील मोठ्या नालीवर स्लॅब टाकण्याचे काम शुक्रवारी सुरू होणार होते. त्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना जमिनीतून गेलेले बीएसएनएलचे केबल तुटले. केबल तुटताच बीसएसएनएलची इंटरनेट, मोबाइल, लँडलाइनची सेवा अचानक बंद पडली. ही बाब कळताच बीसएसएनएल सहायक महाप्रबंधक संतोष गांधी, उपमहाप्रबंधक प्रमोद धोबे, प्रधान महाप्रबंधक एस.के. अग्रवाल, उपविभागीय अभियंता सतीश काळमेघ, सहायक महाप्रबंधक पी.आय. दातीर, सचिन कावळे, पी.एस. कांडलकर, वंजारी आदी अधिकाऱ्यांनी चौधरी चौकात धाव घेतली. अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करीत कंत्राटदार व संबंधित अधिकाºयांना जाब विचारला. बीएसएनएल अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन ठाणेदारांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार दिलीप पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली.बीएसएनएलविरुद्ध पीडब्ल्यूडीसिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वीच दोन्ही विभागांची केबल शिफ्ट करण्याविषयी चर्चा झाली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. शनिवारी दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये केबल तोडल्यावरून तू-तू, मै-मैची स्थिती निर्माण झाली होती. बीएसएनएलविरुद्ध पीडब्ल्यूडीची स्थिती पाहायला मिळाली.खासगी कंपन्यांचे केबल शाबूतबांधकामस्थळी बीएसएनएलच्या केबल तुटलेल्या, तर खासगी कंपन्यांचे केबल शाबूत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून पीडब्ल्यूडीने कंत्राटदारामार्फत मुद्दामच केबल तोडल्या. तसे नसते तर खासगी कंपन्यांचे केबल सुरक्षित राहिले कसे, असा सवाल बीएसएनएल अधिकाºयांनी उपस्थित केला.

टॅग्स :BSNLबीएसएनएल