बेनोड्यात भावाविरूद्ध भाऊ, मंगरूळात नणंद भावजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:38+5:302021-01-13T04:32:38+5:30
असाईनमेंट ग्रामपंचायत निवडणुकीत नात्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभी अमरावती : जिल्ह्यातील १४ अविरोध ग्रामपंचायती वगळता एकूण ५३७ ग्रामपंचायतमधील ४४१६ जागांसाठी ...

बेनोड्यात भावाविरूद्ध भाऊ, मंगरूळात नणंद भावजय
असाईनमेंट
ग्रामपंचायत निवडणुकीत नात्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभी
अमरावती : जिल्ह्यातील १४ अविरोध ग्रामपंचायती वगळता एकूण ५३७ ग्रामपंचायतमधील ४४१६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीत अनेक आप्त, नातेवाईक एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. कुठे भाऊबंदकीतून, तर कुठे राजकीय वर्चस्वासाठी ही लढाई एकमेकांसमोर उभे ठकून लढली जात आहे. साधारणत: विधानसभा निवडणुकीमध्ये सख्खे भाऊ, चुलत भाऊ बहिण अशा लढती आपण अनुभवल्या आहेत. मात्र, एकाच गावात, तेही ग्रामपंचायत सदस्य म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या बेनोडा येथील प्रभाग क्रमांक ३ मधील लढत रंगतदार ठरली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गावातील नागरिक अनेक राजकीय गटात विखुरले जातात. प्रत्येक च इच्छुकाला उमेदवारी हवी असते. त्यामुळे पॅनलप्रमुखाांकडे दावा केला जातो. अनेकदा एकाच घरातील दोन भाऊ परस्परविरोधी राजकीय पक्षात सक्रिय असतात. दोघांचेही मतदान एकाच वार्डात असते. त्यामुळे दोघेही परस्परांविरोधात उभे ठाकतात, हा पुर्वानुभव आहे. तर, एखाद्या दुसºया ठिकाणी भावाभावांमध्ये पटत नसल्याने व राजकीय महत्वाकांक्षा तीव्र असल्याने नात्यागोत्यातील लढती रंगतदार व निकालाची उत्कंठा वाढविणाºया ठरतात.
----------
अशी आहे निवडणूक
५३७ ग्रामपंचायत निवडणुका
१७८२ एकूण प्रभाग संख्या
४४१६ रिंगणातील उमेदवार
---------
नात्यागोत्यातील लढती
ुबेनोड्याची लढत
(१) वरूड तालुक्यातील बेनोडा शहीद या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे. येथे वार्ड क्र. ३ मध्ये दोन सख्खे भाऊ एकाच गटात आमनेसामने आले आहेत. याच वाडार्तून ननंद भावजय सुद्धा एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवित असून अतिशय चूरशीच्या या लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष वेधले जाते आहे.
----
मंगरूळ दस्तगीरची लढत
२) धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर येथील नणंद भावजयमध्ये होणाºया लढतीकडे संपुर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
याच तालक्यातील शहापूर जुना धामणगावमधील प्रभाग क्रमांक ४ मध्ये चुलतभाऊ परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.
कावली येथे पुतण्या विरुद्ध चुलत काकू , तेथेच चुलत भाचा विरुद्ध मामी ही लढत देखील नागरिकांसाठी उत्कंठावर्धक राहणार आहे.
--------