थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST2021-07-11T04:11:06+5:302021-07-11T04:11:06+5:30

अमरावती : महानगरातील प्रभाग क्र. १ ते २ आणि ९ मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक संपर्क प्रमुख दिलीप जाधव ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : महानगरातील प्रभाग क्र. १ ते २ आणि ९ मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक संपर्क प्रमुख दिलीप जाधव यांचे अध्यक्षतेत पार पडली. यावेळी पराग गुडधे, राजेश वानखडे, विजय ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते.

.................................................................................................................................................

संचमान्यता पोर्टलवर माहिती भरा

अमरावती : सन २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाची संचमान्यता झाली आहे. परंतु, अनेक शाळांची संचमान्यता झाली नाही. त्यामुळे अशा शाळांनी कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संचमान्यता पोर्टलवर भरावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

......................................

पावसामुळे शेतीची कामे खोळंबली

अमरावती : शनिवारी शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतात पाणी साचल्याने ही कामे शेतकऱ्यांना तूर्तास बंद ठेवावी लागलीत.

..............................................................................................

शहरात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त

अमरावती : कठोरा नाका परिसरात दररोज वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऐन पाणी पुरवठ्याची वेळ असतानाच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: Brief news