थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST2021-04-24T04:13:39+5:302021-04-24T04:13:39+5:30

अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेत पार पडली. अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेत पार पडली. अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पाणीटंचाई व सिंचनाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

.....................................

शासकीय कार्यालये दोन दिवस बंद

अमरावती : शनिवार व रविवारी सुटी असल्याने नेहमीप्रमाणे शासकीय कार्यालयांना टाळे राहणार आहेत. त्यामुळे सोमवारपासूनच शासकीय कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होईल.

..................................

शिक्षण विभागात शिक्षक बदलीची तयारी

अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक बदल्यांची प्रशासकीय तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. याकरिता शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे.

.......................

कृषी समितीची सभा

अमरावती : कृषी विषय समितीची सभा विविध विषयांना अनुसरून सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी संदर्भातील विषयावर सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

............................

गर्ल्स चौक ते बियाणी चौकाकडे जाणारा रस्ता उखडला

अमरावती : इर्विन ते बियाणी चौकाकडे जाणारा डांबरी रस्ता चांगलाच उखडला आहे. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

Web Title: Brief news