थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:23+5:302021-04-22T04:13:23+5:30
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात गोरगरिबांच्या रोटीसाठी मोफत शिवभोजन थाळी ...

थोडक्यातील बातम्या
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात गोरगरिबांच्या रोटीसाठी मोफत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या थाळीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
..........................
दुपारी रस्त्यावर सानसूच
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यावर नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. परंतु दुपारी मात्र शहरातील अनेक मार्गावर शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
......................................
स्थायी समितीच्या सभेची तयारी
अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा दोन दिवसांत होऊ घातली आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेसाठी प्रशासकीय तयारी सुरू केली आहे.
...............................................
आरोग्य केंद्रात लस टंचाई
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र ग्रामीण भागातील पीएचसीत सुरू करण्यात आले आहेत. मात्र लसीचा साठा संपल्याने पुन्हा लसीकरणाची मोहीम थांबली आहे.
........................................
टवलार ते वाल्मिकपूर रस्ता उखडला
अचलपूर : तालुक्यातील टवलार ते वाल्मिकपूर गावाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. या मार्गाने दुचाकीने जाणे तर सोडा पायी चालणेही कठीण झाले आहे. अतिशय खराब झालेल्या या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होणार, हा खरा प्रश्न आहे.