थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST2021-02-10T04:14:19+5:302021-02-10T04:14:19+5:30

अमरावती रेशीम शेती व रेशीम उद्योगाबाबत जनजागृतीसाठी रेशीम संचालनालयातर्फे रेशीमरथ जिल्ह्यात फिरणार आहे.रथाचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती रेशीम शेती व रेशीम उद्योगाबाबत जनजागृतीसाठी रेशीम संचालनालयातर्फे रेशीमरथ जिल्ह्यात फिरणार आहे.रथाचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.यावेळी आ. बळवंत वानखडे, झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे, रेशीमचे सुनील भोयर आदी उपस्थित होते.

.........................

एडीओंची झूमॲपवर सभा

अमरावती: जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने मंगळवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रेवती साबळे यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेशी संवाद साधून महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

...................

अंजनगाव येथे आशा दिवस

अंजनगाव सुजी : आशा स्वयंमसेविका योजने अंतर्गत बुधवार १० फेब्रुवारी रोजी दिनापुरी महाराज मंदिर बुधवारा येथे आशा दिवस आयोजित केला आहे.यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.

.......................

प्लॉस्टीक बॉल क्रिकेट सामने

धारणी : येथे प्लास्टीक बॉल क्रिकेट सामने १० फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उदघाटन आ.राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

.....................

कोंडेश्र्वर येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव रद्द

अमरावती: कोविड १९ च्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार यंदाचा तिर्थक्षेत्र कोंडेश्र्वर येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.मात्र भाविकांची दर्शनाची सोय शिस्तबध्द पध्दतीने केली जाणार आहे.

Web Title: Brief news