संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST2020-12-05T04:18:21+5:302020-12-05T04:18:21+5:30
अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील कांतानगरातून ४० हजार रुपये किमतीची एमएच०४ जीक्यू ३३७७ ही दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून ...

संक्षिप्त बातम्या
अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील कांतानगरातून ४० हजार रुपये किमतीची एमएच०४ जीक्यू ३३७७ ही दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. फिर्यादी रीतेश विजय पिल्ले (४४, रा. कांतानगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. शहरात दुचाकीचोरीच्या घटना वाढल्या आहेत.
-------------------------------------------------------------------------------
मोबाईल जबरीने हिसकून पडाले
अमरावती : अल्पवयीन मुलगा चायनीज फूड खाण्याकरिता जात असताना, दुचाकीवरून दोन अज्ञात युवक आले. त्यांनी गणेशनगर येथील रहिवासी असलेल्या मुलाच्या हातातील १७ हजारांचा मोबाईल हिसकून पळ काढला. ही घटना बुधवारी जुन्या बायपास मार्गावरील मनोहर मंगल कार्यालयानजीक घडली.
---------------------------------------------------------------------
घरातून १० हजाराचा मोबाईल चोरी
अमरावती उघड्या घरातून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना गुरुवारी नंदनवन कॉलनीत घडली. एका महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
----------------------------------------------------------------------------
कॉर्टन मार्केटजवळून दुचाकी लंपास
अमरावती : शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केटजवळून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना २८ नोव्हे्ंबर रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला. एमएच २७ ए एक्स ०२३९ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. फिर्यादी सुनील मधुकर तायडे (३९, रा. बोरगाव धर्माळे) यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली.