शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यात वीट व्यवसाय तेजीत

By admin | Updated: November 6, 2014 00:50 IST

हिवाळ्याची चाहूल लागताच वीटभट्टीचालकांनी आपल्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. यामुळे वीट तयार करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सुनील देशपांडे अचलपूरहिवाळ्याची चाहूल लागताच वीटभट्टीचालकांनी आपल्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. यामुळे वीट तयार करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अचलपूर, परतवाड्यासह ग्रामीण भागातील मंदावलेल्या बांधकामांना गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. रेतीवर बंदी असूनही अवैध मार्गाने घर बांधकामासाठी रेती सहज उपलब्ध होत असल्याने जुळ्या शहरासह तालुक्यात घर बांधकाम बाराही सुरू राहते. मागील काही दिवसांपासून विटांचे भाव कडाडले होते. काही वीटभट्ट्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे घर बांधकामाची प्रक्रिया थंडावली होती. तसेच पावसाळ्यात वीटभट्टी व्यावसायिकांनी वीटभट्ट्या बंद ठेवल्या होत्या. विटा मिळणे कठीण झाले होते. मात्र आता वीट व्यवसायाला सुरूवात झाली असून सापन नदीच्या काठावर वीटभट्ट्या लावल्या जात आहेत. काही भट्ट्या नदीपात्रात तर काही शेतात लावल्या जात आहेत. या वीटभट्ट्यांना लागणारे पाणी शेतातील विहिरीतून पुरविले जाते. पाणी देणारे शेतमालक दरवर्षी हजारो रूपये कमावतात. शेतातील विहिरीतील पाणी देणे हे कायद्यात मोडत नसून अशांवर कारवाई करण्याची मागणी तीन-चार वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते जगतराव पोटे यांनी तहसीलदार आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडे केली होती. वीटभट्ट्या जेमतेम सुरू झाल्या असून त्यांना भाजून तयार करण्यासाठी बराच अवधी लागतो. त्यामुळे सध्या विटा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्याच तर तिला मोठी किंमत मोजावी लागते. यामुळे ग्रामीण भागात सहसा होळीनंतरच बांधकामाला सुरूवात होते. मात्र, मागणीचा विचार करता वीट व्यवसायाला दीड महिना अगोदरच सुरूवात करण्यात आली आहे. काही वीटभट्टीवाले शेतकऱ्यांच्या शेतातील माती चोरून नेत असल्याच्या तक्रारी आहेत. काही वीटभट्टीवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ट्रॅक्टरने शेतातील माती चोरून आणतात. यामुळे सात ते आठ वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. साहेबराव भुस्कुटे यांच्या नदीकाठच्या शेतातील माती चोरून नेताना त्यांनी ट्रॅक्टर रंगेहात पकडले होते. त्यांनी चालकाला हटकले असता त्यांचेवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी हल्ला केला होता. तहसीलदार याबाबत कडक धोरण अवलंबत नसल्याने काही वीटभट्टीचालकांचे फावत आहे.विटा हा बांधकाम साहित्यातील अत्यंक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही दिवसांपासून विटांचे दर प्रचंड वधारले आहेत. त्यामुुळे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय तेजीत असल्याचे दिसते. कोणतेही लहान-मोठे बांधकाम करताना विटांची गरज भासते. दिवाळीनंतर वीटभट्ट्या लावण्यास सुरूवात होते. सध्या वीटभट्टी चालकांनी भट्ट्या लावण्यास सुरूवात केली आहे. अनेकांच्या हाताला त्यामुळे काम मिळाले आहे. अनेकदा नियमांचे उल्लंघन करून लावण्यात येणाऱ्या वीटभट्ट्यांमुळे आसपासच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागात सुरू होणाऱ्या बांधकामांच्या अनुषंगाने वीटभट्ट्या लावल्या जातात. यंदा यादृष्टीने विचार केल्यास नियमबाह्य पध्दतीने लावण्यात येणाऱ्या वीटभट्ट्या पर्यावरणास घातक ठरतात. अशा वीटभट्टीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.