शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

आचारसंहितेमुळे राज्यात ‘अभिनव’ला ब्रेक, सहकाराचे 90 कोटी परत जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 8:50 PM

शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी जुळविणे.

मोहन राऊत/अमरावती

शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी जुळविणे, जागतिक बाजारपेठेत कृषी व पूरक उद्योग सुरू करणे यासाठी राज्यात सुरू केलेल्या अटल अर्थसाहाय्य योजना ‘अभिनव’ला आदर्श आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’ लागले आहेत. सहकार विभागाला दिलेला ४९० कोटींचा निधी मार्चअखेर खर्च होत नसल्याने तो वित्तविभागाला परत जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व आर्थिक वर्षाचा मार्च महिना एकाच वेळी आल्याने खर्च न होणारा निधी शासनतिजोरीत जमा होणार आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाने २ जानेवारी रोजी अध्यादेश काढून सहकारला पाठबळ देण्यासाठी अटल अर्थसाहाय्य योजना सुरू केली. या योजनेत राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना सहकारी संस्थांमार्फत कृषिक्षेत्राशी व स्थानिक गरजेशी संबंधित सेवा व्यवसाय व उद्योग उभे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

४० लाखांचा प्रकल्प भाजीपाला स्वच्छता यंत्र, गोदाम, दुय्यम प्रक्रिया युनिट, मोबाइल रिटेल वेअर शॉप, जलशुद्धीकरण यंत्र, कृषिमाल पॅकेजिंग, कापडी पिशव्या निर्मितीसाठी ४० लाखांचा निधी  सहकार विभागाकडून देण्यात येतो. जिल्हा उपनिबंधक, विभागीय  सहायक निबंधक यांच्या दोन समित्यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर राज्य समितीचे अध्यक्ष असलेले सहकार मंत्री या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देतात. सहकार विभागाकडे अल्प प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातच आचारसंहिता लागली आहे. 

३५५ तालुक्यांसाठी ४९० कोटी सहकार विभागाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५५ तालुक्यांसाठी ४९० कोटी रुपयांची तरतूद  केली होती. मार्च अखेरपर्यंत हा निधी खर्च करणे अपेक्षित होते. सन २०१८-१९ मध्ये या योजनेच्या प्रथम वर्षाच्या अंमलबजावणीच्या मूल्यमापनानंतर सदर योजना पुढे चालू ठेवण्याबाबत शासनाला निर्णय घेता येणार आहे.

जिल्ह्यात अटल अर्थसाहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी १४ तालुक्यांकरिता १९  कोटी ३२ लाखांची तरतूद सहकार विभागाने केली आहे. जिल्ह्यातील दहा प्रस्तावांना जिल्हा समितीने मंजुरात देऊन, ते सहकार विभागाकडे पाठविले आहेत.- एस.यू. जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती 

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती