चिखलदरा येथील शाखा अभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:46 IST2019-03-27T21:46:07+5:302019-03-27T21:46:40+5:30

मेळघाटात वादग्रस्त ठरलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात दरसूचीप्रमाणे अंदाजपत्रके तयार न करताही त्यास तांत्रिक मान्यता दिल्याच्या कारणावरून येथील पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक राठोड यांना बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी निलंबित केले. यात आणखी काही जणांवर कारवाई केली जाणार असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Branch Engineer suspended at Chikhaldara | चिखलदरा येथील शाखा अभियंता निलंबित

चिखलदरा येथील शाखा अभियंता निलंबित

ठळक मुद्देमेळघाटातील मग्रारोहयो कामांत अनियमितता : आयुक्तांचा आदेश, सीईओंची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटात वादग्रस्त ठरलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात दरसूचीप्रमाणे अंदाजपत्रके तयार न करताही त्यास तांत्रिक मान्यता दिल्याच्या कारणावरून येथील पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक राठोड यांना बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी निलंबित केले. यात आणखी काही जणांवर कारवाई केली जाणार असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मेळघाटात मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या कोट्यवधीच्या कामांपैकी चिखलदरा तालुक्यातील सर्व ४७ कामांची तपासणी अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्ह्यांतील अभियंत्यांकडून दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. ही तपासणी जिल्ह्यातील विविध यंत्रणेमार्फत पाचव्यांदा करण्यात आली होती, हे विशेष.
तपासणी अहवाल समितीने विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे संबंधित अभियंत्यांनी सोपविला होता. त्यामध्ये मग्रारोहयोच्या अंदाजपत्रकात रोजगार हमी योजनेचे निकष व नियमानुसार दरसूचीनेप्रमाणे अंदाजपत्रके तयार केली नसतानाही तांत्रिक मान्यता दिली असल्याचा ठपका शाखा अभियंता विवेक राठोड यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी तात्काळ निलंबित केले. इतरांविरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
धारणी तालुक्यात चौकशी नाही
धारणी तालुक्यात मग्रारोहयोची कोट्यवधीची कामे बड्या राजकारण्यांनी केल्याचे सत्य आहे. मात्र, तेथे कुठल्याच प्रकारची चौकशी समितीने केली नाही. दुसरीकडे चिखलदरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मग्रारोहयोच्या कामावर साहित्यपुरवठा केला. त्यांची देयकेसुद्धा अजूनपर्यंत काढण्यात आली नाहीत. यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मग्रारोहयोच्या नियमानुसार कामे न केल्याचा अहवाल चौकशी समितीने दिल्यानंतर शाखा अभियंता विवेक राठोड यांना निलंबित करण्यात आले. संबंधितांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल.
- मनीषा खत्री, सीईओ
जिल्हा परिषद, अमरावती

Web Title: Branch Engineer suspended at Chikhaldara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.