छत्री तलाव परिसर सौंदर्यीकरणास ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:35 IST2019-04-02T22:35:05+5:302019-04-02T22:35:24+5:30
महापालिका क्षेत्रातील छत्री तलाव परिसराचे सौंदर्यीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाने सिमेंट काँक्रीटीकरण जोरात सुरू असून, हा प्रकार जैवविविधतेला धोका निर्माण करणारा असल्याची तक्रार पोहरा जंगल बचाव समितीने केली होती. त्यानुसार मंगळवारी महापालिका, वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासकांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे.

छत्री तलाव परिसर सौंदर्यीकरणास ब्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रातील छत्री तलाव परिसराचे सौंदर्यीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाने सिमेंट काँक्रीटीकरण जोरात सुरू असून, हा प्रकार जैवविविधतेला धोका निर्माण करणारा असल्याची तक्रार पोहरा जंगल बचाव समितीने केली होती. त्यानुसार मंगळवारी महापालिका, वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासकांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे.
पोहरा जंगल बचाव समितीचे नीलेश कंचनपुरे यांनी १३ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्री तलाव परिसराचे विकासकामांच्या नावे जोरात सिमेंट काँक्रीटीकरण होत असल्याची तक्रार दिली होती. या कामांमुळे जंगलातील जैवविविधता संपुष्टात येऊन वन्यजिवांना तृष्णा भागविण्यासाठी पाणी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. १०० कोटी रुपयांच्या निधीतून छत्रीतलाव परिसराचे सौदर्यीकरण होत असले तरी वन्यक्षेत्र बाधित होणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, महापालिका शहर अभियंता पवार, अनंत पोतदार, प्रमोद कुळकर्णी, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, नीलेश कंचनपुरे, वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे, जयंत वडतकर, सागर मैदानकर, अभिजित कडू, नीलेश करवाडे, वनपाल घागरे आदींनी छत्री तलाव परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचीपाहणी केली. भविष्यात ही विकास कामे जंगल, वन्यजीवांसाठी धोकादायक असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला गेला.
महापालिका प्रशासन ही कामे करीत आहे. त्याबाबत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- गजेंद्र नरवणे
उपवनसंरक्षक, अमरावती.