कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:36+5:30
दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या विलंबाने गारद झाले, तर शेतातील सोयाबीन अतिपावसाने शेतामध्येच कुजले.

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप
अनंत बोबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका यंदाच्या खरीप हंगामात अव्याहत सुरू आहे. आता ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिकच वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक कापून शेतातून हद्दपार केले आहे.
दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या विलंबाने गारद झाले, तर शेतातील सोयाबीन अतिपावसाने शेतामध्येच कुजले. आता बोंडअळीने कपाशीवर हल्ला केला आहे.
येवदा येथील एकनाथ नामदेव बोरकर, संदीप चोरे, गजानन शिंगाडे, संदीप वडतकर, सावतराम कुरेकर, वरूड कुलट येथील जगदीश बगले, येरंडगाव येथील अमोल पुरी यांसारख्या अनेक शेतकºयांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडताच आपल्या शेतातील उभे पीक उपटून काढले आहे. काही पिके बोंडअळीच्या सावटात असल्याने तीसुद्धा शेतकºयांनी उपडून फेकण्यास सुरूवात केली आहे. एकरी १५ ते २० क्विंटल कापूस उत्पादनाचे स्वप्न डोळ्यांदेखत विरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
येवदा परिसरात अनेक शेतकºयांच्या घरांमध्ये अद्यापही कापूस आलेला नाही. त्यातच तूर पिकावरसुद्धा ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकºयांना आज सर्वंकष मदतीची गरज असताना शासन मदतीचा हात देईल का, याकडे आशेने जगत आहे.