एक हजार हेक्टरला बोगस बियाण्यांचा फटका
By Admin | Updated: July 29, 2014 23:35 IST2014-07-29T23:35:19+5:302014-07-29T23:35:19+5:30
तालुक्यात तळेगाव दशासर परिसरातील तब्बल आठ गावांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे़ वीस दिवसांत शेतात पेरलेले बियाणे उगविलेच नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कृषी

एक हजार हेक्टरला बोगस बियाण्यांचा फटका
धामणगाव (रेल्वे) : तालुक्यात तळेगाव दशासर परिसरातील तब्बल आठ गावांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे़ वीस दिवसांत शेतात पेरलेले बियाणे उगविलेच नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. संबंधित कंपनीविरुध्द फौजदारी कारवाई करण्यासाठी या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा मार्ग पत्करला आहे़
धामणगाव तालुक्याला दरवर्षी बोगस बियाण्याचा फटका बसतो. यात सर्वाधिक सोयाबीन बियाणे बोगस निघतात ही वस्तुस्थिती आहे़ मागील वीस दिवसांपूर्वी तळेगाव दशासर परिसरातील वाढोणा, शेंदूरजनाखुर्द, कामनापूर घुसळी, काशीखेड, मलातपूर या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी आपल्या शेतात केली, परंतु अद्यापही हे बियाणे निघालेच नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे़ अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकाराचे व बँकेचे कर्ज घेवून आपल्या शेतीची पेरणी केली़ विशेषत: कृषी विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उगवन क्षमता तपासली तरीही ही बियाणे निघालेच नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहे़ गत दोन दिवसांत कृषी कार्यालयात तब्बल पन्नासच्या जवळपास बोगस बियाण्यांच्या तक्रारी आल्या आहेत़
दरवर्षी कागदाचा खेळ
मागील वर्षी शिदोडी, चिंचपूर, वरूड बगाजी, ऐरली या भागातील बोगस सोयाबीने बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचे उघड झाले होते़ यापरिसरातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयापासून तर पुण्याच्या कृषी आयुक्तालया पर्यंत तक्रारी दाखल केलेल्या होत्या.