बेनोडा शहीद शिवारात विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST2021-03-29T04:08:48+5:302021-03-29T04:08:48+5:30

बेनोडा (शहीद) : शिवारातील चोबीतकर यांच्या शेतात २७ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचे प्रेत विहिरीत ...

The body of a young man was found in a well in Benoda Shaheed Shivara | बेनोडा शहीद शिवारात विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

बेनोडा शहीद शिवारात विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

बेनोडा (शहीद) : शिवारातील चोबीतकर यांच्या शेतात २७ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचे प्रेत विहिरीत तरंगताना आढळून आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. ही आत्महत्या की घातपात, या चर्चेला गावात ऊत आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, सागर महादेव काट्टे (२८, रा. बेनोडा) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी जेवण करून तो घरून निघून गेला होता. वृद्ध आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. अखेर शनिवारी सकाळी १० वाजता गावालगतच्या चोबीतकर यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरूडच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविला. डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. हा घातपात की आत्महत्या, हा संभ्रम कायम आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सर्वांना आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनात बेनोडा शहीद पोलीस करीत आहेत.

Web Title: The body of a young man was found in a well in Benoda Shaheed Shivara