विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST2021-03-29T04:08:33+5:302021-03-29T04:08:33+5:30

बेनोडा शहीद : येथील चोबीतकर यांच्या शेतात २७ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचे प्रेत ...

The body of a young man was found in a well | विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

बेनोडा शहीद : येथील चोबीतकर यांच्या शेतात २७ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचे प्रेत विहिरीत तरंगताना आढळून आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ती आत्महत्या की घातपात? या चर्चेला गावात ऊत आला आहे.

सागर महादेव काट्टे (२८, रा. बेनोडा) असे मृताचे नाव आहे. दोन दिवसांपासून तो घरून निघून गेला होता. कुटुंबांनी त्याची शोधाशोध केली. परंतु तो आढळून आला नाही. गुरुवारी सायंकाळी जेवण करून निघून गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृत हा आविवाहित होता. अखेर शनिवारी सकाळी १० वाजता गावालगतच्या चोबीतकर यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह सागरचाच आहे? अशी खात्री झाल्यावर सागरच्या आई वडिलांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दुपारी ३ वाजता बेनोडा शहीद हिंदूस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनात बेनोडा शहीद पोलीस करीत आहे. हा घातपात की, आत्महत्या असा संभ्रम कायम आहे, शवविच्छेदन अहवालाअंती कारण स्पष्ट होईल.

Web Title: The body of a young man was found in a well