विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला
By Admin | Updated: October 4, 2014 23:18 IST2014-10-04T23:18:30+5:302014-10-04T23:18:30+5:30
विवाहितेची हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करुन आरोपींना अटक करण्यात अंजनगावचे पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा

विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला
काकाचा आरोप : कारवाईसाठी पोलिसांची टाळाटाळ
अमरावती : विवाहितेची हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करुन आरोपींना अटक करण्यात अंजनगावचे पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. या प्रकरणात पाणी मुरत असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला.
चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव पिंप्री येथील रहिवासी राजेंद्र लंगोटे यांची पुतणी रूपालीचा विवाह ८ जुलै २००७ रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील सतीश बबन तुरखडे याचे सोबत झाला होता. लग्नानंतर सतत रूपालीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता, असे रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुलीचा छळ थांबावा आणि तिचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी रूपालीचे वडील अरविंद लंगोटे यांनी सतीशला पहिल्यांदा २५ हजार रूपये दिले होते. त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिल्याने गाडी खरेदी करण्यासाठी ३० हजार रूपये दिले. परंतु पैशांसाठी हपापलेल्या सतीश व त्याच्या कुटुंबीयांचे एवढ्यावर समाधान झाले नाही. त्यानंतरही पैशांसाठी तिचा छळ सुुरूच राहिला.
दरम्यान, गत २२ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान रूपालीने भ्रमणध्वनीवरून वडिलांशी संपर्क साधून खोडगावला येऊन तिला घेऊन जाण्याचा आग्रह धरला होता. रूपालीच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार फोनवर रूपाली सतत रडत होती. त्याचवेळी रूपालीने तिच्या जिवाला धोका असल्याचेसुध्दा वडिलांना सांगितले होते.