एकाच विहिरीत आढळला पित्यासह मुलाचा मृतदेह
By Admin | Updated: August 9, 2014 23:26 IST2014-08-09T23:26:16+5:302014-08-09T23:26:16+5:30
गरिबी आणि जन्मांध मुलाच्या आजारामुळे कंटाळून मुलासोबत त्याच्या वडिलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील लेहगाव येथे घडली. मुलाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी सापडल्यानंतर

एकाच विहिरीत आढळला पित्यासह मुलाचा मृतदेह
लेहेगाव येथील घटना : गावात पसरली शोककळा
मोर्शी : गरिबी आणि जन्मांध मुलाच्या आजारामुळे कंटाळून मुलासोबत त्याच्या वडिलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील लेहगाव येथे घडली. मुलाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी सापडल्यानंतर शनिवारी वडिलांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात आढळला.
जन्मांध मुलासोबत तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या भीमरावचे शव शनिवारी विहिरीत आढळून आले. विशेष असे की, याच विहिरीत दोन दिवसांपूर्वी मुलाचे शव मिळाले होते. एकूणच जन्मांध मुलासोबत त्याच्या वडिलाने विहिरीत आत्महत्या केल्याची चर्चा आहे. लेहगाव येथील भीमराव पांडुरंग मेश्राम हे पत्नी आणि दोन मुलांसोबत मोलमजुरी करुन प्रपंच चालवित होते. त्यांचा लहान मुलगा सुनील (२०) हा जन्मांध होता, शिवाय तो नेहमीच आजारी राहत असे. त्यामुळे या मुलाच्या शौचापासून त्याचे सर्व दैनंदिन कामे भीमराव आणि त्याची पत्नी करीत होते. आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यातच जन्मांध आणि आजारी मुलगा त्यामुळे भीमरावची नेहमीच तारांबळ उडत असे.