स्वाक्षरीसाठी निळ्या शाईचा पेन बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:09+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व मुख्यालयीन, तालुकास्तरीय व क्षेत्रीय कार्यालयांमधील टिपणी लिहिताना व पत्रावर स्वाक्षरी करताना काळ्याऐवजी निळ्या शाईच्या पेनचा वापर बंधनकारक करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी येडगे यांनी यासंबंधी परिपत्रक काढले.

स्वाक्षरीसाठी निळ्या शाईचा पेन बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कार्यालयीन पत्रावर स्वाक्षरीसाठी निळ्या शाईच्या पेनचा वापर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व मुख्यालयीन, तालुकास्तरीय व क्षेत्रीय कार्यालयांमधील टिपणी लिहिताना व पत्रावर स्वाक्षरी करताना काळ्याऐवजी निळ्या शाईच्या पेनचा वापर बंधनकारक करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी येडगे यांनी यासंबंधी परिपत्रक काढले.
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभाग, तालुकास्तरीय कार्यालये, क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांतील संबंधित अधिकारी व कर्मचारी हे हस्तलिखित टिपणी वरिष्ठांच्या मान्यतेकरिता अथवा स्वाक्षरीकरिता पाठवित असताना टिपणी ही काळ्या शाईने लिहित आहेत. संबंधित विभागाचे प्रमुखदेखील पत्रावर काळ्या शाईचा वापर करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. काळ्या शाईचा वापर केल्याने मूळ प्रत व छायांकित पत्र कोणती, याच बोध होत नाही.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी याबाबत अधिनस्थ यंत्रणेला सूचना देण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आदेशित केले आहे.