शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्याने रक्तदानाने केली सहजीवनाची सुरूवात!

By admin | Updated: May 30, 2015 00:28 IST

एकीकडे विवाह सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांची उधळण करणे अभिमानाचे मानले जाते.

५० वऱ्हाडींचे रक्तदान : रक्तदाता संघाचा उल्लेखनीय पुढाकार गजानन नानोटकर पुसलाएकीकडे विवाह सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांची उधळण करणे अभिमानाचे मानले जाते. यातूनच सामाजिक प्रतिष्ठा जोपासली जात असल्याचा समज रूढ आहे. फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, बँड आदींवर लाखोंचा निरर्थक खर्च केला जातो. परंतु दुसरीकडे येथील चोपडे आणि खासबागे कुटुंबाच्या विवाह सोहळ्यात ५० वऱ्हाडींनी रक्तदान करून या प्रथेला फाटा दिला आणि सामाजिक भान जपले. या विवाह सोहळयात ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ वरुडच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या वधू-वराने देखील या राष्ट्रीय कार्याला हातभार लावण्यासाठी चक्क स्वत: रक्तदान केले. त्यांच्यासह इतर ५० वऱ्हाडींनी रक्तदानाचे कार्य पार पाडले. विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च करून थोतांड असलेल्या प्रथा आणि परंपरा जपण्याचा खटाटोप केला जातो. या परंपरेला फाट देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय चोपडे आणि खासबागे कुटुंबाने घेतला. वधुपिता रामदास चोपडे आणि वरुड येथील वरपक्षाचे दिगंबरराव खासबागे यांच्यामध्ये सुध्दा प्रणाली आणि महेंद्र यांच्या विवाह सोहळयाला वेगळे रूप देण्यास मान्यता दिली. वरुडच्या ग्रामीण रुगणालयाशी संलग्न रक्तदाता संघाने गोरगरिबांना मोफत रक्तपुरवठा करण्याचा संकल्प घेतला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तथा रक्तदाता संघाचे कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार यासाठी प्रयत्न करीत आहेत. रक्तदान शिबिरात उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार बाळासाहेब तिडके, ठाणेदार अर्जुन ठोसरे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार अशोक लांडे, प्राथामिक आरोग्य केंद्र पुसलाचे वैद्यकिय अधिकारी तुषार ठाकरे, राहुल भुतडा, समाजप्रबोधनचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, काशीकर, जायन्टसचे नितीन खेरडे, जि.प. सदस्य राजश्री श्रीराव, पंचायत समिती सदस्या सुनीता डाहाके, विजय श्रीराव, गजानन डाहाके आदींची उपस्थिती होती.