नवदाम्पत्याने रक्तदानाने केली सहजीवनाची सुरूवात!

By Admin | Updated: May 30, 2015 00:28 IST2015-05-30T00:28:11+5:302015-05-30T00:28:11+5:30

एकीकडे विवाह सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांची उधळण करणे अभिमानाचे मानले जाते.

Blood donation started by the donation! | नवदाम्पत्याने रक्तदानाने केली सहजीवनाची सुरूवात!

नवदाम्पत्याने रक्तदानाने केली सहजीवनाची सुरूवात!

५० वऱ्हाडींचे रक्तदान : रक्तदाता संघाचा उल्लेखनीय पुढाकार
गजानन नानोटकर पुसला
एकीकडे विवाह सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांची उधळण करणे अभिमानाचे मानले जाते. यातूनच सामाजिक प्रतिष्ठा जोपासली जात असल्याचा समज रूढ आहे. फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, बँड आदींवर लाखोंचा निरर्थक खर्च केला जातो. परंतु दुसरीकडे येथील चोपडे आणि खासबागे कुटुंबाच्या विवाह सोहळ्यात ५० वऱ्हाडींनी रक्तदान करून या प्रथेला फाटा दिला आणि सामाजिक भान जपले.
या विवाह सोहळयात ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ वरुडच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या वधू-वराने देखील या राष्ट्रीय कार्याला हातभार लावण्यासाठी चक्क स्वत: रक्तदान केले. त्यांच्यासह इतर ५० वऱ्हाडींनी रक्तदानाचे कार्य पार पाडले.
विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च करून थोतांड असलेल्या प्रथा आणि परंपरा जपण्याचा खटाटोप केला जातो. या परंपरेला फाट देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय चोपडे आणि खासबागे कुटुंबाने घेतला. वधुपिता रामदास चोपडे आणि वरुड येथील वरपक्षाचे दिगंबरराव खासबागे यांच्यामध्ये सुध्दा प्रणाली आणि महेंद्र यांच्या विवाह सोहळयाला वेगळे रूप देण्यास मान्यता दिली. वरुडच्या ग्रामीण रुगणालयाशी संलग्न रक्तदाता संघाने गोरगरिबांना मोफत रक्तपुरवठा करण्याचा संकल्प घेतला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तथा रक्तदाता संघाचे कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार यासाठी प्रयत्न करीत आहेत.
रक्तदान शिबिरात उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार बाळासाहेब तिडके, ठाणेदार अर्जुन ठोसरे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार अशोक लांडे, प्राथामिक आरोग्य केंद्र पुसलाचे वैद्यकिय अधिकारी तुषार ठाकरे, राहुल भुतडा, समाजप्रबोधनचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, काशीकर, जायन्टसचे नितीन खेरडे, जि.प. सदस्य राजश्री श्रीराव, पंचायत समिती सदस्या सुनीता डाहाके, विजय श्रीराव, गजानन डाहाके आदींची उपस्थिती होती.

Web Title: Blood donation started by the donation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.