रक्तदान शिबिराने साजरा केला विवाह सोहळा
By Admin | Updated: March 4, 2015 00:27 IST2015-03-04T00:27:53+5:302015-03-04T00:27:53+5:30
लग्न समारंभात पैशाची उधळपट्टी नेहमीच केली जाते. फटाके, बँड व आर्केस्ट्रा

रक्तदान शिबिराने साजरा केला विवाह सोहळा
आॅर्केस्ट्रा झुगारुन गजानन सेवेकरांचे ‘भजन’ : सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम
सुरेश सवळे चांदूरबाजार
लग्न समारंभात पैशाची उधळपट्टी नेहमीच केली जाते. फटाके, बँड व आर्केस्ट्रा सारखे अति खर्चाचे कार्यक्रम करून आपल्या ऐश्वर्याची प्रसिद्धी करण्याच्या परंपरेला चांदूरबाजार येथील तिरमारे परिवाराने फाटा दिला. विवाहसोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोेजन करुन त्यांनी नवा पायंडा पाडला आहे.
स्थानिक नगरपरिषदेतील अग्नीशमन गाडीच्या चालक पदावरून सेवानिवृत्त झालेले पांडूरंग तिरमारे यांच्या सामान्य कुटुंबातील त्यांचे तीनही मुल पदविधर आहे. थोरला मुलगा मदन याने स्वत:ची नोकरी सांभाळून फावल्या वेळात स्वत:ला गजानन महाराजांच्या सेवा समितीत वाहून घेतले तर गोपाल तिरमारे यांनी स्वत:ला राजकीय व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. हा परिवार व्यायाम शाळेच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवा वर्गाला अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहकार्याने विविध व्यायाम व संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे उपक्रम सतत राबवित असतात.
अशातच याच परिवारातील वैद्यकीय क्षेत्रात पदविधर असलेल्या निलेशचे लग्न नुकतेच वर्धेत पार पडले. त्याचा रिशेप्शन कार्यक्रम नुकताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळेत पार पडला. या समारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांनी गजानन सेवा समितीच्या भजनाचा आनंद घेतला यात सिनेमाची गाणी वाजविणे वर्ज्य करण्यात आले होते तर ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून वर नीलेश, वधू पूजा यांना आशीर्वाद दिले.या उपक्रमात आ. बच्चू कडू, नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, रहेमानभाई, नजीर अहेमद कुरेशी, भैय्यासाहेब लंगोटे, एजाजअली, श्रखी श्रीवास यांची उपस्थिती होती.