करजगाव येथे लोकमत व प्रहार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:13+5:302021-07-07T04:15:13+5:30
करजगाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं ...

करजगाव येथे लोकमत व प्रहार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर
करजगाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत करजगाव येथे लोकमत वृत्तपत्र समूह व प्रहार पक्षाच्यावतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करजगाव येथे श्री शंकरराव विद्यालयात सोमवारी करण्यात आले.
याप्रसंगी प्रारंभी वृक्षारोपण करण्यात आले. सोमवारी करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनाकाळात अविरत सेवा देणारे ठाणेदार पंकज दाभाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा खडसे, डॉ. अर्पिता लंगडे, डॉ. अंजली लहाने यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती वनमाला गणेशकर, योगिता जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य सुरेश भेंडे, सुरेश गणेशकार, कुऱ्हा देलवाडी सरपंच अर्चना भुस्कडे, संदीप घुलक्षे, बाळकृष्ण धाडसे, देविदास म्हाला, नितीन चौधरी, संजय वसू, राजेश सोलव, विशाल चौधरी, दीपक गवई, मंगेश चौधरी, सचिन सोलव, विकास कांडलकर उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता उद्धव ठाकरे, अविनाश तायडे यांनी योगदान दिले.
050721\img20210705132310.jpg~050721\img20210705114741.jpg
शिबिराला संबोधित करताना ठाणेदार पंकज दाभाडे व मंचावर उपस्थित मान्यवर~रक्तदान शिबीर