शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘डफरीन’मध्ये सुरू होणार रक्तपेढी

By admin | Updated: May 25, 2016 00:32 IST

येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) मध्ये प्रसूत महिलांना दरदिवशी १५ ते २० रक्त पिशव्या लागत असल्यामुळे ....

शासनाकडे प्रस्ताव : फॉलोअर खाटांचीदेखील मागणीअमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) मध्ये प्रसूत महिलांना दरदिवशी १५ ते २० रक्त पिशव्या लागत असल्यामुळे येथे नव्याने रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तूर्तास इर्विनमधील रक्तपेढीतून रक्त मागविले जात आहे.‘डफरीन’चे अधीक्षक संजय वारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तावात ‘डफरीन’ कायम आजार असल्याचे स्पष्ट केले आहे. मनुष्यबळाचा अभाव, सोयी-सुविधांची वानवा या महत्त्वपूर्ण बाबींमुळे उपचार करणे कठीण झाल्याचे विषद केले आहे. ‘डफरीन’ची रुग्णक्षमता ही २०० असताना येथे ३५० ते ४०० महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यामुळे आरोग्यसुविधा पुरविताना यंत्रणेची दमछाक होत आहे. रूग्णालयात साधन सामुग्रीचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यसेवा संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ‘डफरीन’मध्ये रुग्णसेवेचा ताण ही नित्याचीच बाब असताना मेळघाटसह ग्रामीण भागातील गंभीर स्वरुपाच्या महिला रूग्णांना प्रसूती, उपचाराकरिता भरती केले जाते. सध्या ‘डफरीन’ला रक्ताचा तुटवडा या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रसूत महिलांना वेळीच रक्ताचा पुरवठा करता न आल्याने जानेवारी ते एप्रिल २०१६ या चार महिन्याच्या कालावधीत तीन गर्भवती मातांना मृत्यूच्या दारी जावे लागले. साधन-सामुग्री, सोयी-सुविधांअभावी रुग्णांचा मूत्यू होणे, ही बाब अतिशय खेदजनक आहे. रुग्णसेवा कोलमडण्याची भीतीअमरावती : रुग्णसेवेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी कैफियत जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक वारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. अलिकडे ‘डफरीन’मध्ये रक्तसंकलन केंद्र असले तरी रक्तासाठी इर्विनवर अवलंबून राहावे लागते. येथील एक रेडिओलॉजिस्ट, ३० परिचारीका आणि १४ अधिपरिचारीकांचे पद रिक्त असून ते शासनाने त्वरीत भरावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वॉर्डात रुग्णसेवेसाठी कंत्राटी पद्धतीने ३४ कक्षसेवक नेमण्यात आले आहे. मात्र, आरोग्य उपसंचालकांनी हे कक्षसेवक बंद करण्याचे फर्मान जारी केले आहे. येत्या काळात कक्षसेवक बंद केल्यास ‘डफरीन’ मधील रुग्णसेवा कोलमडेल, अशी भीती आहे. ‘डफरीन’मध्ये उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.