१२ ला खून; १३ ला मृतदेहाची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:41 IST2018-01-19T00:40:49+5:302018-01-19T00:41:00+5:30

दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील शेख शारीफ शेख लतीफचा १२ आॅगस्टला गळा आवळून खून करण्यात आला, तर दुसºया दिवशी १३ आॅगस्टला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

Blood 12; 13th disposal of the dead body | १२ ला खून; १३ ला मृतदेहाची विल्हेवाट

१२ ला खून; १३ ला मृतदेहाची विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील शेख शारीफ शेख लतीफचा १२ आॅगस्टला गळा आवळून खून करण्यात आला, तर दुसºया दिवशी १३ आॅगस्टला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मामी-भाचाच्या अनैतिक संबंधात सख्खा मामा असलेल्या शेख शारीफला जीव गमवावा लागला. मुख्य आरोपी अल्ताफ शाहसह जावेद शाह, मोहसीन शाह व हसन शाह हे चौघे १२ आॅगस्ट २०१७ रोजी अल्ताफ शाहसाठी दुचाकी विकत घेण्याच्या बहाण्याने शारीफला अकोटला घेऊन गेले. अकोट-पोपटखेड रस्त्यावरील हडीच्या कारखान्याजवळ त्याचा गळा आवळून मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिला. १३ आॅगस्टला अल्ताफ व त्याची मामी फरजाना परवीन हिला काही न सांगताच अकोट येथील जावेद शाह, मोहसीन शाह व हुसेन शाह या तिघांनी शारीफच्या मृतदेहाची घटनास्थळी खड्डा खोदून विल्हेवाट लावल्याचे तपासात समोर येत असलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
शारीफ हत्याप्रकरण : ग्रामीण गुन्हे शाखेने केली चौकशी
मृतदेह बेपत्ता

पोलिसांना शारीफचे पँट-शर्ट व चपला खड्ड्याच्या काठावर आढळून आल्या होत्या. जेसीबीच्या साह्याने संपूर्ण परिसर खोदूनही शरीराचा कोणताही अवयव आढळून आला नाही. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे.
गुन्हे शाखेचीही निराशा
आरोपींच्या कोठडीला सहा दिवस होऊनदेखील दर्यापूर पोलिसांना काहीच माहिती प्राप्त होत नसल्याने ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने पाचही आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्याही पदरी निराशाच आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Blood 12; 13th disposal of the dead body