भाजपची वळवळ शेणातील किड्याप्रमाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:13 IST2020-07-18T11:13:16+5:302020-07-18T11:13:39+5:30

शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे.

BJP's turn is like a worm in a dunghill! | भाजपची वळवळ शेणातील किड्याप्रमाणे !

भाजपची वळवळ शेणातील किड्याप्रमाणे !

ठळक मुद्देनाठाळाच्या माथी काठी हाणायची कशी, ते जाणतो


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे. केंद्रात इतकी मोठी सत्ता प्राप्त झाली असताना त्यांना हाव मात्र राज्यात बहुमतात असलेल्या सत्तेत खोडा घालण्याची आहे, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे. यशोमती ठाकूर या राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्रीदेखील आहेत, त्यांनी शुक्रवारी लोकमतशी संवाद साधला.

कुणी आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, कुणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आम्ही चांगलेच बदडू. आम्ही गांधीवादी आहोत, हे खरे आहे; परंतु आम्ही तुकाराम महाराजांचीही शिकवण शिकलेलो आहोत.
नाठाळाच्या डोक्यावर काठी कशी हाणायची, हे आम्हाला उत्तमरीत्या ज्ञात आहे. तुमची गाठ आमच्याशी आहे. यशोमतीशी आहे, हे याद राखा, असा दम यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांना भरला.

- तर भूकंप होईल!
महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाराष्ट्राने देशाला नवा फॉर्म्यूला दिला आहे. माजी मुख्यमंत्री ज्यांना सोबत घेऊन फिरताहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत. यातून ते लोक किती कमजोर आणि त्यांचा पक्ष किती दुर्बल झाला आहे, हे लक्षात यावे. भाजपच्या १०५ आमदारांमध्ये आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधी आमच्यात परत येतील, याची तुम्ही काय गॅरंटी घेऊ शकता, असा सवाल त्यांनी भाजपला उद्देशून केला. कोण-कोण लोक आमच्या संपर्कात आहेत, हे तुम्हाला कळले ना, तर मोठा भूकंप होईल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: BJP's turn is like a worm in a dunghill!