शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

कर्जमाफीसाठी भाजपाचे थाळी वाजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST

कोरोनाच्या संकट काळात सरकारने जाहीर केल्यानुसार अनेक शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी ऐन खरीप हंगामात नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे पेरणीकरिता पैशांची तडजोड कुठून करायची, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाने मागील कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे.

ठळक मुद्देजिल्हाकचेरी, मध्यवर्ती बँकेवर धडक : सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नवीन कर्ज मिळत नसल्याची बाब लक्षात घेता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करून नवीन कर्ज द्यावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर थाळी वाजवा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कोरोनाच्या संकट काळात सरकारने जाहीर केल्यानुसार अनेक शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी ऐन खरीप हंगामात नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे पेरणीकरिता पैशांची तडजोड कुठून करायची, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाने मागील कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे. अशांना छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यांना सरकारने कर्जपुरवठा करण्याचे आदेश बँकांना द्यावे. आर्थिक विंवचनेत समस्त जनता त्रस्त आहे. अशावेळी महावितरणने भरसाठ विजेची दरवाढ करून एकाचवेळी तीन महिन्यांची देयके दिली आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी वीज देयके माफ करावे आदी मागण्या भाजपाने आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे केल्या आहेत. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा बँकेचे व्यवस्थापन आदींना देण्यात आले आहेत. आंदोलनात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, आमदार प्रताप अडसड, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, माजी आमदार रमेश बुंदिले, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, चेतन गावंडे, दिनेश सूर्यवंशी, कुसूम शाहू, प्रणय कुलकर्णी, कमलकांत लाडोळे, सपना गुडधे, प्रवीण तायडे, शरद मोहोड, सारंग खोडस्कर, संजय घुलक्षे, संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, रविराज देशमुख आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाCrop Loanपीक कर्ज