वाढीव मालमत्ता कर विरोधात भाजपाचा मोर्चा
By Admin | Updated: August 1, 2014 00:04 IST2014-08-01T00:04:46+5:302014-08-01T00:04:46+5:30
जुन्या मालमत्ता कराच्या तुलनेत नवीन मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. या वाढीचे कोणतेही संयुक्तीक कारण देण्यात आलेले नसल्याने शहर भाजपाच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर

वाढीव मालमत्ता कर विरोधात भाजपाचा मोर्चा
करात अव्वाच्या सव्वा वाढ : संयुक्तिक कारण नाही
अंजनगाव सुर्जी : जुन्या मालमत्ता कराच्या तुलनेत नवीन मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. या वाढीचे कोणतेही संयुक्तीक कारण देण्यात आलेले नसल्याने शहर भाजपाच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
नगरपरिषद द्वारा नुकतेच नवीन मालमत्ता कराची मागणी बिले नागरिकांना देण्यात आली यामध्ये मूळ रक्कमेपेक्षा अधिकची रक्कम टाकण्याचा आरोप होता. नाल्या आणि वृक्ष नसताना नाला आणि वृक्षकर वसुलीचे मागणी बिलात करण्यात आली. शहरात नवीन बांधकाम न करता वाढीव मागणी बिल देण्यात आली व वाढीव रकमेच्या समर्थनासाठी कोणताही उल्लेख बिलात केलेले नाहीत, असा आक्षेप ४ मोर्चेकरांनी केला. शहर भाजपा अध्यक्ष मनोहर मुरकुटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे, माजी नगराध्यक्ष मंजुषा लोळे, संगीता काळे, विक्रम पाठक, गणेश पिंगे, दिलीप भोपळे, मनीष मेण, महादेव भावे, देवेंद्र नेमाडे, मनोज गुजर, सुनील बेराड, सुधीर रेखाते, गोविंद भावे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)